एरंडोल येथे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:26 PM2019-02-02T17:26:59+5:302019-02-02T17:27:12+5:30
एरंडोल : ग्रामीण उन्नती विद्यालयात परितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे चिटणीस तथा भाजपाचे विभागीय संघटन ...
एरंडोल : ग्रामीण उन्नती विद्यालयात परितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे चिटणीस तथा भाजपाचे विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते.
संस्थाध्यक्ष सचिन विसपुते, समाधान पाटील, सरपंच आरीफ शेख, रावसाहेब पाटील, सोनजी पाटील, कारभारी पाटील, राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, विठ्ठल पाटील, डी.एम. जैन पालक व विद्यार्थी उपस्थित हाते.
कला, क्रीडा स्पर्धांमधील विजेते व गुणवंत विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवविण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात देशभक्तीवर गीते, नृत्य व नाट्यछटा, समूहनृत्यांचा समावेश होता.
प्रास्ताविक सचिन विसपुते यांनी केले. सूत्रसंचालन संजय मराठे व रुपाली जाधव यांनी केले. मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते यांनी स्वागत केले. ज्योती वडगावकर यांनी आभार मानले.