जळगावातील कांचननगरात उभी रिक्षा जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:42 PM2018-10-13T12:42:49+5:302018-10-13T12:43:21+5:30
सततच्या घटनांमुळे घबराटीचे वातावरण
जळगाव : कांचननगरमध्ये गुड्डू हरदे यांच्या मालकीची उभी रिक्षा अज्ञातांनी जाळून टाकल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.
गेल्या अनेक दिवसांपासून कांचननगर परिसरामध्ये पेट्रोल चोरी, गाड्यांची तोडफोड असे प्रकार घडत आहे. या बाबत रहिवाशांनी तक्रार करूनही पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी रात्री या भागात लावलेली गुड्डू हरदे यांच्या मालकीची रिक्षा अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. सततच्या घटनांमुळे परिसरामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.