रिक्षा चालकाची आत्महत्या
By admin | Published: January 10, 2017 12:55 AM2017-01-10T00:55:52+5:302017-01-10T00:55:52+5:30
कारण अस्पष्ट : तिस:या मजल्यावर घेतला गळफास
जळगाव : कांचन नगरात श्याम सीताराम पाटील (वय 48) या रिक्षा चालकाने बांधकाम सुरु असलेल्या तिस:या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाटील यांना दारुचे व्यसन होते व कौटूंबिक परिस्थितीही हलाखीची होती त्यामुळे त्यातून हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाटील हे प}ी अलकाबाई, मुलगा राकेश व तेजस अशा दोन मुलांसोबत कांचन नगरात भाडय़ाच्या खोलीत राहत होते. तर मोठी मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले आहे. त्यांना दारुचे व्यसन होते. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाडय़ाची रिक्षाही चालविण्यास सुरुवात केली होती. मात्र दारुच्या व्यसनामुळे रिक्षाचे भाडे देणेही अवघड होत होते. त्यामुळे घरात कुटुंबियांसोबत नेहमीच वाद व्हायचे. कधी कधी तर बाहेरच राहत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची पाहणी करुन पंचनामा केला व त्यांचा मृतदेहा जिल्हा रूग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिका:यांनी तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केली. मुलगा राकेश पाटील याच्या माहितीवरुन शनिपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिली. पुढील तपास दिलीप बडगुजर करीत आहेत.
प}ी व मुलांचा आक्रोश
रविवारी रात्री कुटुंबिय घरात झापले असताना श्याम पाटील हे उशिराने घरी आले. मात्र घरात न येताच ते तिस:या मजल्यावर बांधकाम सुरु असलेल्या खोलीत गेले. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शेजारच्यांना श्याम हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ प}ी अलकबाई यांना घटनेची माहिती दिली. अलकाबाई व मुलांनी धाव घेत गळफास घेतल्याचे पाहताच हंबरडा फोडला.