जळगावनजीक महामार्गावर रिक्षा उलटली; यावलचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:11 PM2018-08-24T12:11:14+5:302018-08-24T12:12:02+5:30

अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला कट मारल्याने रिक्षा महामार्गावर उलटली

Rickshaw has landed on the Jalgaon Highway; His wife killed | जळगावनजीक महामार्गावर रिक्षा उलटली; यावलचे दाम्पत्य ठार

जळगावनजीक महामार्गावर रिक्षा उलटली; यावलचे दाम्पत्य ठार

googlenewsNext
ठळक मुद्देपाच प्रवासी जखमी अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल

नशिराबाद, जि. जळगाव : भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला कट मारल्याने रिक्षा महामार्गावर उलटली. त्यात पती-पत्नी ठार झाले तर रिक्षातील अन्य पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना नशिराबादनजीक महामार्गावर खिर्डी शिवारात पाटील नर्सरीजवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
शर्मिला उर्फ प्रमिला सुभाष चौधरी (५०) व सुभाष निवृत्ती चौधरी (५५) (रा.यावल, धनगरवाडा) असे मृतांचे नाव आहे. हे दोघे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. घरी जाण्यासाठी रिक्षा स्टॉपवर आले. रिक्षा (क्रमांक एम.एच.१९-बी.जे. ६०३७) भुसावळकडे जाण्यासाठी प्रवासी घेवून निघाली. मागून भरधाव वेगात येणा-या अज्ञात चारचाकी वाहनाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार कट मारल्याने रिक्षा उलटली. त्यातील प्रवासी बाहेर फेकले गेले. शर्मिला उर्फ प्रमीला सुुभाष चौधरी यांचा जागी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, राजेंद्र साळुंखे, युनुस शेख, चेतन पाटील, नामदेव ठाकरे, आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
रिक्षा चालक मुकुंद सुभाष गिरनारे (३५, रा. वांजोळा, भुसावळ), नजमाबी सैयद कमरोद्दीन (६०, बामणोद), अबीदाबी शेख रशीद (वय ६५, रा. साकेगाव), कमला पोपट चौधरी (वय ६५, रा.तुकारामनगर भुसावळ), तुळसाबाई पुंडलिक वारके (वय ६५, रा.भुसावळ) गंभीर जखमी आहे. जखमींवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहे. रिक्षा चालक मुकुंदा गिरनारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल आहे.

Web Title: Rickshaw has landed on the Jalgaon Highway; His wife killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.