रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

By विजय.सैतवाल | Published: October 7, 2023 11:36 PM2023-10-07T23:36:35+5:302023-10-07T23:37:03+5:30

ममुराबाद जवळ अपघात : रिक्षा चालकही जखमी

rickshaw two wheeler collided one dead | रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : भरधाव रिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (४५, रा. पार्वती ओक नगर) हे जागीच ठार झाले. हा अपघात शनिवार, सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबादजळील पेट्रोलपंपासमोर झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय कोळी हे दुचाकीने  (क्र. एमएच १९, एवाय ७९०५)   विदगावहून जळगावकडे येत होते. त्यावेळी एक रिक्षा (क्र. एमएच १९, व्ही ३६४२)  मजुरांना घेवून यावलकडे जात होती. ममुराबादजवळील फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि  रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात  दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व पोहेकॉ विलास शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी  कोळी यांना नागरिकांच्या मदतीने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाहनांची  झालेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा व  दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचालकदेखील जखमी झाला आहे.
अपघातानंतर मयताच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title: rickshaw two wheeler collided one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात