जळगाव शहरात महामार्गावर रात्री ९.३० वाजता डंपरने उडविले रिक्षाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:59 PM2018-05-22T23:59:10+5:302018-05-22T23:59:10+5:30
भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२२ : भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणाºया रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला. या अपघातानंतर चालकाने लागलीच पळ काढला तर क्लिनरच्या दिशेने बसलेल्या एका जणाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. हा अपघात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ झाला.
एक जण जखमी
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आसीफ जब्बार पटेल (रा.रामनगर, डी.मार्ट जवळ, जळगाव) या रिक्षा चालकाने पिंप्राळा परिसरात प्रवाशी सोडल्यानंतर घराकडे जात असताना गुजराल पेट्रोल पंपापासून हाकेच्या अंतरावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (क्र.एम.एच.०४ डी.के.६२०८) विरुध्द दिशेला जाऊन रिक्षाला (क्र.एम.एच.१९ व्ही.५९२७) जोरदार धडक दिली. त्यात नशिब बलवत्तर म्हणून रिक्षा चालकाला दुखापत झाली नाही, मात्र मागच्या सीटवर बसलेला मित्र सुनील नियामतखा तडवी याच्या पायाला दुखापत झाली. या अपघातात तडवी याचा मोबाईल व पैसे असलेले पाकीटही चोरी गेले.
दूधाच्या टॅँकरलाही दिली धडक
रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याच्याकडेला थांबलेल्या दुधाच्या टॅँकरवर (क्र.एम.एच.१९ झेड.५०८०) धडकले. टॅँकरचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा टॅँकर शहरात येत होता. चालक त्याच परिसरात राहत असल्याने त्याचा जेवणाचा डबा घरुन येत असल्यामुळे टॅँकर तेथे थांबविण्यात आला होता.
चालक समजून दुस-यालाच मारहाण
या अपघातामुळे संतप्त जमावाने चालक समजून शेजारी बसलेल्या कैलास दत्तू पाटील (रा.बांभोरी, ता.धरणगाव) याला मारहाणकेली. त्याच्या अंगावरील कपडेही फाटले होते. तर मार खाण्याच्या भीतीने चालकाने गर्दीतून पळ काढला. चालकाचे नाव भूषण असल्याचे कैलास याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडून कैलास याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणले. सुनील भास्कर पाटील (रा.सावदे, ता.एरंडोल,ह.मु.जळगाव) यांच्या मालकीचे हे डंपर असल्याचे समजले.डंपरवरहीतसाउल्लेखआहे.
रात्री९.३०वाजता वाहतुकीची कोंडी
या अपघातामुळे दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सागर शिंपी हे सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याशिवाय जिल्हा पेठ, रामानंद व पोलीस उपअधीक्षकांचे पथकही दाखल झाले. या कर्मचाºयांनी वाहतूक सुरळीत केली. नगरसेवक अमर जैन यांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.