भोईटे गटाविरुद्धही दंगलीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:24+5:302021-03-29T04:11:24+5:30
जळगाव : मविप्र संस्थेच्या वादातून शनिवारी विजय भास्कर पाटील गटाच्या सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी भोईटे गटाच्या ...
जळगाव : मविप्र संस्थेच्या वादातून शनिवारी विजय भास्कर पाटील गटाच्या सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी भोईटे गटाच्या नऊ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. महेश आनंदा पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निलेश रणजीत भोईटे, शिवाजी केशव भोईटे, निळकंठ शंकर काटकर, प्रकाश आनंदा पाटील, योगेश रणजीत भोईटे,रमेश दगडू धुमाळ, गणेश दगडू धुमाळ ,पुण्यप्रताप दयाराम पाटील व संजय भिमराव निंबाळकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
महेश आनंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारी मविप्र संस्थेच्या कार्यालयात ३० मार्च रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची पूर्वतयारीचे कामकाज करीत असताना दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान निलेश भोईटे, शिवाजी भोईटे, निळकंठ काटकर, प्रकाश पाटील, योगेश भोईटे, रमेश धुमाळ गणेश धुमाळ, पुण्यप्रताप पाटील, दयाराम पाटील, संजय निंबाळकर, सुनील भोईटे यांच्यासह दहा ते पंधरा जण संस्थेच्या कार्यालयात आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. त्यातील एकाने जमिनीवर पाडून मारहाण केली. हा गोंधळ पाहून मनोज भास्कर पाटील, पीयुष पाटील व शांताराम सोनवणे हे बाहेर आले असता भोईटे गटाने त्यांना शिवीगाळ करून ''तुम्ही कोर्टाचा निकाल नाचवतात का''? एकदा तुम्हाला संपवून टाकू असे म्हणत अंगावर धावून आले. यावेळी एकाने पोलिसांना फोन लावा असे म्हटले असता पोलीस येण्याच्या भीतीने सर्व जण पळून गेले असे फिर्यादीत नमूद केले आहे.