सोन्याची ‘अक्षय’ भाववाढ, दर ६१,५०० वर; पावणेतीन वर्षांनंतर चांदीचाही विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 06:54 AM2023-04-15T06:54:44+5:302023-04-15T06:55:10+5:30

सोने- चांदीमध्ये सुरू असलेली भाववाढ कायम असून, शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावाने नवा विक्रम नोंदवीत ते ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

rise in gold prices up 61500 A silver record after fifty-three years | सोन्याची ‘अक्षय’ भाववाढ, दर ६१,५०० वर; पावणेतीन वर्षांनंतर चांदीचाही विक्रम

सोन्याची ‘अक्षय’ भाववाढ, दर ६१,५०० वर; पावणेतीन वर्षांनंतर चांदीचाही विक्रम

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल

जळगाव :

सोने- चांदीमध्ये सुरू असलेली भाववाढ कायम असून, शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावाने नवा विक्रम नोंदवीत ते ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चांदीच्याही भावाने दोन वर्षे आठ महिन्यांनी पुन्हा एकदा ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर झेप घेतली आहे. अक्षयतृतीया सणाला आठवडा शिल्लक आहे. त्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेली भाववाढ ‘अक्षय’ असून, याचा बाजारावर कोणताही परिणाम नसल्याचे 
चित्र आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अमेरिकन बँकांची स्थिती व वेगवेगळ्या देशांमधील राष्ट्रीय बँकांनी सोने खरेदी सुरू केली. या सोबतच शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ- उतारामुळे सोन्याचे भाव वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात चांदीलाही मागणी वाढू लागल्याने तिचेही भाव वाढत आहेत. 

तेजी राहणार कायम
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठांत डॉलर विकले जात आहेत, म्हणजे प्रत्येक देश त्यांच्या देशाचे चलन वापरत आहेत. डॉलर वापरले जात नाही. या घोषणेचा परिणाम सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे रशियाकडून डायमंड विकत घेऊ नका, असे अमेरिकेने सर्व देशांना सांगितले आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. यापुढेही सोन्यात तेजी राहील. 
- कुमार जैन, अध्यक्ष,     मुंबई ज्वेलर्स असो.

चांदीचा पुन्हा उच्चांक 
सोन्याबरोबरच चांदीचेही भाव एक हजाराने वधारले व ती ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. यापूर्वी ७ ऑगस्ट २०२० रोजीदेखील चांदी ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर होती. 
त्यानंतर मात्र एकाच दिवसात तिच्यात १२ हजार रुपयांची घसरण झाली होती. मात्र, आता 
पुन्हा भाववाढ सुरू होऊन ती दोन वर्षे आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. 

राेज नवा विक्रम
नऊ दिवसांपूर्वी ५ एप्रिल रोजी सोने ६१ हजार १०० रुपये प्रतितोळा या विक्रमी भावावर पोहोचले होते. त्यानंतर आता तोही विक्रम मागे टाकत १४ एप्रिल रोजी सोने ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

...सोन्यात अशी झाली वाढ
५९,८०० - १८ मार्च २०२३
६०,२००- २० मार्च २०२३
६१,१००- ५ एप्रिल २०२३
६१,५००- १४ एप्रिल २०२३

Web Title: rise in gold prices up 61500 A silver record after fifty-three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं