राज्यस्तरीय खुल्या नाट्यगीत गायन स्पर्धेत ऋषभ पारिसे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 05:55 PM2019-02-01T17:55:58+5:302019-02-01T17:56:11+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा
चोपडा : श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात उत्साहात झाली.
स्पर्धेचे उद््घाटन मिरज येथील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर भांडारे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोदावरी वैद्यकीय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील होते. व्यासपीठावर डॉ. विकास हरताळकर, डॉ. लोकेंद्र महाजन, चंद्रहास गुजराथी, बाळासाहेब सूर्यवंशी, वसंत मयूर, नंदकिशोर पाटील, बँक आॅफ इंडियाचे मॅनेजर स्वप्नील पाटील, सुधाकर केंगे, एस.टी. कुलकर्णी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ख्यातनाम शास्त्रीय गायिका बकुळ पंडित (पुणे) व औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक विश्वनाथ दाशरथे यांनी परीक्षण केले. तबलासाठी शंकर महाजन, मालेगाव व हार्मोनियमवर गिरिष मोघे, जळगाव यांनी संगीत साथ केली. स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील विजेते
प्रथम - ऋषभ सुनील पारिसे, अकोला, द्वितीय भक्ती सुनील पवार, जालना, तृतीय - कल्याणी मारुती शेठे, पुणे, उत्तेजनार्थ - सागर प्रभाकर मैस्त्री, मुंबई, अनुराग दीपक पवार, बुलडाणा - श्रुती राजेंद्र जोशी, जळगाव.
सर्व विजयी स्पर्धकांना धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बकुळ पंडित यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक मनोज चित्रकथी यांनी केले. सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले तर विजय पालीवाल यांनी आभार मानले.
यशस्वीतेसाठी विजय जैस्वाल, डॉ. मनोज साळुंखे, एस. के. पाटील, बी. यू. जाधव, प्रदीप कोळी, राकेश विसपुते, गोपाळ निकम, भोलानाथ पाटील, नीलेश कासार, डॉ.श्यामकांत पाटील, विजय सोळंकी, विवेक बाविस्कर, दुर्गेश चौधरी, उपेंद्र जोहरी, दुर्गेश पवार, अमर संस्थेचे मुकेश चौधरी, विजय दीक्षित, मयुरेश्वर सोनवणे, आदींनी परिश्रम घेतले.