विजेच्या मागणीत वाढ, दीपनगरचे दोन संच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:19+5:302021-07-04T04:13:19+5:30
दीपनगर, ता. भुसावळ : विजेची मागणी वाढल्याने येथील वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चार व पाच हे २ जुलैपासून ...
दीपनगर, ता. भुसावळ : विजेची मागणी वाढल्याने येथील वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चार व पाच हे २ जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
विजेची मागणी कमी झाल्याने दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच बंद करण्यात आले होते. हे दोन्ही संच ८ जूनपासून प्रशासनाला बंद करण्याची वेळ आली होती. २१०मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक तीन बंद असल्याने दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातून होणारे १२१० मेगावॅट विजेची निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र विजेची मागणी वाढल्यामुळे दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅटचे दोन्ही संच शुक्रवारी सकाळी १२ वाजेपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही संचमधून हजार मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असल्याचे जनसंपर्क अधिकारी सचिन कवितके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या पावसाळा सुरू असला तरी ओल्या कोळशाची समस्या नाही. कोळसा पूर्णपणे तातडीने झाकलेला असल्याने कोळसा ओला होण्याची शक्यता नसते. दीपनगर प्रशासनाकडे सध्या मुबलक कोळशाचा साठा शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.