प्लास्टिक वस्तूंसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:54+5:302021-09-22T04:18:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्याच्या प्लास्टिकपासून बनणाऱ्या आणि प्लास्टिक पुनर्वापर करून उत्पादन तयार करणाऱ्या उद्योगांना अडचणीचा सामना करावा ...

Rising prices of raw materials for plastic goods | प्लास्टिक वस्तूंसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ

प्लास्टिक वस्तूंसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्याच्या प्लास्टिकपासून बनणाऱ्या आणि प्लास्टिक पुनर्वापर करून उत्पादन तयार करणाऱ्या उद्योगांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा फटका हा प्लास्टिक उत्पादनांना बसला आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने बहुतेक प्लास्टिक वस्तूंचे दर देखील वाढले आहेत. व्हर्जिन ग्रॅन्युअल्सच्या दरातही वाढ झाली आहे.

जळगाव शहरात प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून चटई, खुर्च्यांसह इतर वस्तू बनवण्याचा उद्योग मोठा आहे. या भाववाढीचा फटका शहरातील जवळपास १५० उद्योगांना बसला आहे.

कचरा म्हणून फेकले जाणारे प्लास्टिक गोळा करून त्यापासून रिसायकल प्लास्टिक ग्रॅन्युअल्स बनवले जातात. याच ग्रॅन्युअल्सचा वापर करून शहरातील १५० पेक्षा जास्त उद्योग विविध वस्तू बनवतात. देशभरातून कचरा म्हणून फेकलेले प्लास्टिक जळगाव शहरात येते आणि त्याचा कच्चा माल बनवला जातो. सध्या हाच कच्चा माल ३० रुपयांपासून पुढे विकला जात आहे. या पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बादल्या, खुर्च्या, पीव्हीसी पाईप आणि इतर वस्तू बनवल्या जातात. मार्च २०२० च्या आधी २० रुपये किलो दराने विकले जाणारे ग्रॅन्युअल्स आता महागले आहेत.

काय आहे प्लास्टिक रिसायकलिंगचा व्यवसाय

कचरा म्हणून फेकले जाणारे प्लास्टिक गोळा केले जाते. त्यापासून विशिष्ट प्रकाराचे प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात. त्याचा उपयोग करून प्लास्टिकच्या नव्या वस्तू तयार केल्या जातात. या उद्योगासाठी देशभरातून कचरा म्हणून गोळा केलेले प्लास्टिक जळगावला आणले जाते.

होत असलेला प्लास्टिकचा पुनर्वापर

७५० मेट्रिक टन प्रति दिवस

अवलंबून असलेले उद्योग

१५०

अवलंबून असलेले कामगार

२० हजार

अवलंबून असलेले उद्योग

चटई उद्योग, ड्रिप इरिगेशन, रिसायकल ग्रॅन्युअल्स

कुठून येतो प्लास्टिक कचरा

छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, केरळ

सध्याचे दर

व्हर्जिन ग्रॅन्युअल्स १०० ते ११५ रुपये

रिसायकल ग्रॅन्युअल्स ३० रुपयांपासून पुढे

कोट -

गेल्या वर्षभरापासून या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यात ८० ते ८५ रुपये दराने मिळणारे व्हर्जिन ग्रॅन्युअल्स आता १०० ते ११५ रुपये दराने मिळत आहे. तसेच रिसायकल केलेल्या कच्च्या मालाच्या दरात देखील २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- महेंद्र रायसोनी, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मॅट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन.

Web Title: Rising prices of raw materials for plastic goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.