अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:16 AM2021-05-24T04:16:06+5:302021-05-24T04:16:06+5:30
रस्त्याची दुरुस्ती जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली ...
रस्त्याची दुरुस्ती
जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशाच प्रकारे जिल्हापेठ परिसरातील थोर संमित्र मंगल कार्यालय रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
अपघाताचा धोका
जळगाव : पिंप्राळा रिक्षा स्टॉपकडून बाजार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. दगड-खडींचा वापर करून खड्डा बुजविण्यात आला आहे. यात दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रहिवासी त्रस्त
जळगाव : शहरात विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गिरणा टाकी परिसर, रामानंदनगर, वाघनगर, जिजाऊनगर रस्त्यावर मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात. रात्रीच्या वेळी ते वाहनांच्यामागे लागत असल्याने वाहनधारकदेखील त्रस्त झाले आहे.