रेल्वे रूळ ओलांडताना जीव धोक्यात
By admin | Published: May 20, 2017 12:40 AM2017-05-20T00:40:44+5:302017-05-20T00:40:44+5:30
रेल्वे नियमांना जंक्शनवर ‘खो’ : गुन्हा दाखल केला तरी प्रवाशांची बेफिकिरी कायम
भुसावळ : रेल्वे रूळ ओलांडणे तसा कायद्याने गुन्हाच मात्र प्रवाशांनी स्वत:च्याच जीवाशी खेळ चालवला आह़े रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने अनेकांना अपंगत्व येते तर प्रसंगी मरणही. मात्र हे सारे घडत असतानाही प्रवासी आपल्या जीवाविषयीच बेफिकीर असल्याचे वास्तव भुसावळ स्थानकावर दिवसभरात दिसून येत़े
जंक्शन स्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात इच्छित ठिकाणी प्रवास करतात़ मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडला जात आह़े हा प्रकार म्हणजे थेट जीवाविषयीच एकप्रकारे बेफिकिरी आह़े
जंक्शन स्थानकावर आठ प्लॅटफार्म आहेत़ प्लॅटफार्मवर एखादी एक्स्प्रेस उभी असल्यास मागावून येणारी गाडी दुस:या प्लॅटफार्मवर घेतली जाते त्यामुळे प्रवासी घाईगर्दीत जीन्याचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडतात़ गाडी पकडण्याच्या नादात मागावून एखादी गाडी येत आहे वा नाही याचीदेखील खातरजमा केली जात नाही त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आह़े अनेकदा तर धावत्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवासी रेल्वेखाली येऊन मरण पावण्याच्या वा पाय कापण्याचे प्रकार घडले आहेत़ घरून निघायला उशीर झाल्यास घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडून इच्छीत गाडी पकडताना देखील अनेकदा अपघात झाले आहेत मात्र त्यानंतरही प्रवाशांच्या मानसिकतेत बदल होत नाही़ दिवसभरात किमान 125 वर गाडय़ा थांबतात तर रेल्वे स्थानकासह परिसरात 500 वर प्रवासी रूळ ओलांडतात़
रेल्वे रूळ ओलांडणा:यांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे नियमित कारवाई केली जाते तसेच रेल्वेस्थानकावर त्याबाबत लाऊड स्पीकरवरून देखील प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन केले जाते, मात्र प्रवासी स्वत:च्याच जीवाविषयी बेफिकीर असल्याचे दिसून येते. रेल्वे अधिनियमात अशा प्रवाशांवर कारवाईची तरतूद आह़े रेल्वे न्यायालयात प्रवाशांवर शंभर रुपयांर्पयत त्यात दंड केला जातो़
कानाला मोबाइल वा ईअरफोन लावून गाणे ऐकणा:या उत्साही तरुणांची संख्या कमी नाही़ एका प्लॅटफार्मवरून दुस:या प्लॅटफार्मवर जातानादेखील अनेकांच्या कानाला मोबाइल असतो, त्यामुळे दुसरी रेल्वे प्लॅटफार्मवर येत असली वा हॉर्न वाजला तरी या मंडळींना त्याचे काही देणे घेणे नसते. त्यामुळे येथेच घात होऊन अपघात होतो़ अनेकांचा अशा पद्धतीने भुसावळ रेल्वे विभागात मृत्यू झाला आह़े
रेल्वेस्थानकातील शॉर्टकट तापदायक
रेल्वे स्थानकात शिरण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत़ प्रवासी वेळ वाचविण्याच्या नादात या शॉर्टकटचा वापर करतात, शिवाय धावती गाडी पकडण्यासाठी वा इच्छित प्लॅटफार्मवर जाण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडले जातात़
नियम मोडणा:यांविरुद्ध धडक कारवाई
रेल्वे अॅक्टचा भंग करणा:यांवर रेल्वे सुरक्षा बलाकडून नियमित कारवाई केली जाते, असे आरपीएफ निरीक्षक व्ही़क़ेलांजीवार म्हणाल़े मोहीम राबवू, असे ते म्हणाल़े