जळगावात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:27+5:302021-05-11T04:16:27+5:30
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दोन महिन्यांपासून म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले असून, जळगावातूनच या दुर्मीळ आजाराला वाचा ...
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दोन महिन्यांपासून म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले असून, जळगावातूनच या दुर्मीळ आजाराला वाचा फोडण्यात आली आहे. जळगावात याचे शंभराच्या आसपास रुग्ण असून, ५०पेक्षा अधिक रुग्णांवर यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते सहा रुग्णांचे डोळेही काढावे लागले आहेत. या आजाराच्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना पुणे, मुुंबई येथेच पाठविण्यात येत आहे. जळगावात एका खासगी रुग्णालयात विविध प्रकारच्या यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टाळूला छिद्रे पडल्याचे प्रकारही या आजारात जळगावात निदर्शनास आले आहेत.
नेत्रतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी याबाबत सर्वात आधी जनजागृती करून या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर राज्यभर या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना, अनियंत्रित मधुमेह, स्टेराॅइडचा अतिरिक्त वापर यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. दरम्यान, चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय रुग्णाचा या आजारमुळे एक डोळा काढावा लागल्याची माहिती आहे.