मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव

By Admin | Published: January 20, 2017 12:41 AM2017-01-20T00:41:55+5:302017-01-20T00:41:55+5:30

शहरात एका लिंबाच्या झाडाच्या फांदीतून 24 तासात चक्क दीड लीटर रसस्त्राव होत असल्याची बाब समोर आली आहे.

Rituals from lemon tree in Muktainagar | मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव

मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव

googlenewsNext


मुक्ताईनगर : बहु गुणकारी कडुनिंबाच्या झाडातून रसस्त्राव होण्याचा प्रकार हजारोंपैकी एखाद दुस:या लिंबाच्या झाडात दिसून येतो. ही बाब असामान्य नसली तर शहरात एका लिंबाच्या झाडाच्या फांदीतून 24 तासात चक्क दीड लीटर रसस्त्राव होत असल्याची बाब समोर आली आहे.
आयुव्रेदात कडूनिंबाच्या गुणधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडाच्या पानांपासून तर साल आणि लाकडाचा उपयोग आयुव्रेदातील उपचार पद्धतीत आजही कायम आहे. अशात कडूलिंबाच्या झाडातून होणारा रसस्त्राव सामान्य लिंबाच्या झाडांच्या तुलनेत हजारो झाडांपैकी एखाददुस:यात दिसून येतो मात्र हा प्रकार अथवा झाडातून होणारा रसस्त्राव फारच अल्प असतो आणि दुर्मिळ म्हणून या रसाची ओळख आहे. अर्थातच अॅन्टी बायोटीक्स अथवा अॅन्टी बॅक्टेरियल प्रोडक्ट म्हणूनही त्यास संबोधले जाते तर आयुव्रेदात या रसाला अधिकच गुणकारी असल्याचे जाणकार म्हणतात.
एकंदरीत, बहुगुणधर्माचा हा झाड व त्याचा रसस्त्राव ाजी सरपंच अनिल दत्तात्रय पाटील यांच्या नवीन गावातील गुरांच्या वाडय़ात असलेल्या लिंबाच्या झाडावरील सालवर दिसून आला आहे. झाडाच्या फांदीतून रस पडत असल्याचे प्रथम त्यांचे भाऊ विनोद यांच्या लक्षात आले. हा रसस्त्राव इतका जास्त होता की, झाडाच्या बुंध्याला लागून जमिनीत जात होता. त्याच्याखाली प्लास्टिकचा डबा बांधला. अवघ्या 16 तासात लीटर भर डबा भरून रस डब्याबाहेर ओसंडू लागला. दुस:या दिवशी 24 तासात दीड लीटरपेक्षा अधिक भरला. असे असले तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून तज्ज्ञांच्या मते झाडाला हा रोग आहे. झाडाला आवश्यक अन्नद्रव्याची कमतरता आणि असमतोलामुळे रसस्त्राव होण्याचा प्रकार घडतो. 
त्यास गमोसीस म्हणून संबोधले जाते. रसस्त्रावाची मात्रा कमी-अधिक असू शकते. हे झाडाच्या आजारावर अवलंबून असू शकते. झाड ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीची पोत, हवामानातील बदल यावर रोग अवलंबून असतो, असे एकंदरीत शास्त्रीय कारण यामागे वर्तवले जात आहे.
झाडातून रसस्त्राव होणे हा गमोसीस नावाच्या आजाराने झाड बाधीत असल्याने होत असतो. कडूलिंबाच्या झाडाच्या रसस्त्रावाला आयुव्रेद गुणधर्म असू शकतो परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून हे झाड रोगबाधित असल्याने स्त्राव होत असावा.
- डॉ.जी.के.ससाणे,
प्राचार्य,
शासकीय कृषी महाविद्यालय,
मुक्ताईनगर, जि. जळगाव

Web Title: Rituals from lemon tree in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.