वाळू उपसा बंद असताना नदी पात्रांना ओरबडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:01 PM2019-11-30T13:01:53+5:302019-11-30T13:02:32+5:30

महसूलच्या पथकावर नजर ठेवून दिला जातो चकमा

The river boats continue to scream when the sand dunes are closed | वाळू उपसा बंद असताना नदी पात्रांना ओरबडणे सुरूच

वाळू उपसा बंद असताना नदी पात्रांना ओरबडणे सुरूच

googlenewsNext

जळगाव : वाळू ठेके बंद होऊन उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. सोबतच ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांमधूनही वाळूची चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर वाळू वाहतूकदारांची नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकमा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार सुरू आहे. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो.
आव्हाणे, खेडी, वडनगरी, निमखेडी, सावखेडा, बांभोरी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.
शुक्रवारीदेखील गिरणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने वाळू भरत होती. त्या ठिकाणी वाळू भरून-भरुन नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. या खेरीज मोहाडी परिसरातही चार डंपरद्वारे बेसुमार वाळूचा उपसा केली जात असल्याची तक्रार आहे.
वाळू येते कोठून?
नदी पात्रातून वाळूचा उपसा तर सुरूच आहे, सोबतच निमखेडीत वाळूचा मोठा साठा प्रशासनाला आढळून आला. अशाच प्रकारे आव्हाणे परिसरातही हा साठा असल्याचे समोर आले. जर उपसा बंद आहे तर हा साठा येतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वाळू साठा कोणाचा आहे, यासाठीदेखील कोणी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे महसूलच्या पथकाने निमखेडी येथील २०० ब्रास वाळू जप्त केली. त्यानंतर तर एका जणाने साठवून ठेवलेली वाळू दुसऱ्यानेच पळवून नेल्याचाही प्रकार घटला. त्यामुळे वाळूचा प्रश्न किती तापत आहे, हे सर्वांना समजत असले तरीमहसूलविभागाकडून वाळूचीवाहतूककारोखलीजातनाही,याबद्दलआश्चर्यव्यक्तकेलेजातआहे.
अवैध वाळू वाहतुकीने घेतले बळी
अवैध वाळू उपशामुळे गेल्या वर्षी धरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारात गिरणा नदी पात्राजवळ गुराख्याला तर शिवाजीनगरात एका बालका[ी वाळू वाहतूक करणाºया वाहनाने चिरडले होते. असे गंभीर प्रकार घडूनही अवैध वाळू वाहतूकदारांवर महसूल विभाग मेहरनजर का दाखवित आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक असून ते वाहतुकीवर नजर ठेवून आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचे सध्या काम सुरू असून त्यास प्राधान्य दिले जात आहे. महसूलचे पथक कारवाईस निघताच वाळू वाहतूकदारांकडून पाठलाग सुरू असतो.
- वैशाली हिंगे, तहसीलदार.

Web Title: The river boats continue to scream when the sand dunes are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव