चोपडा शहरातील नदी-नालेसफाई करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:21+5:302021-05-30T04:14:21+5:30

सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने नदी किंवा नाले साफसफाई केव्हा होणार? हा एक प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. चोपडा ...

River-cleaning work in Chopda city started | चोपडा शहरातील नदी-नालेसफाई करण्याचे काम सुरू

चोपडा शहरातील नदी-नालेसफाई करण्याचे काम सुरू

Next

सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने नदी किंवा नाले साफसफाई केव्हा होणार? हा एक प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. चोपडा शहराच्या मध्यभागातून रत्नावती नदी जाते. या नदीच्या धोक्याच्या सीमेच्या अंतर्गत बरीचशी बांधकामे, कॉम्प्लेक्सची कामे झाल्याने नदीपात्र रुंद झाले आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने या नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढून साफसफाई झाल्याने नेहमीप्रमाणे गाळाचे प्रमाण कमी आहे. यावर्षी केवळ नागरिकांनी नदीपात्रात फेकलेला कचरा, झाडे तोडून त्याचे उरलेले अवशेष याचीच साफसफाई प्रशासनाला करावी लागत आहे. तरीही यंदा नगरपालिका प्रशासन कोरोनाकडे अधिक लक्ष देत असल्याने नदी आणि नाले साफसफाई करण्यास विलंब झाला आहे, हे प्रशासन नाकारू शकत नाही.

सध्या नगरपालिकेकडून जेसीबी मशीन गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असून नदीपात्रामध्ये केरकचरा असेल अथवा इतर घाण असेल त्याची साफसफाईचे काम सुरू आहे. मात्र नाल्यांचा विचार केला, तर अरुणनगर शेजारून जाणारा नाला, रामपुरा भागातील नाला या नाल्यांमध्ये सध्या साफसफाई सुरू आहे. या नाल्यांमध्ये काटेरी इंग्रजी बाभळाची झाडे, साचलेला कचरा व गाळ आजही दिसत आहे. हाच कचरा या वाढलेल्या झाडांमध्ये व फरशी पुलाच्या गाळ्यात अडकला की, शेजारील वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरू शकते. म्हणून साफसफाईच्या कामाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. अरुणनगर शेजारील नाल्यामध्ये अजूनही काटेरी झुडपे जशीच्या तशी उभी दिसताहेत. बीएड कॉलेज शेजारून येणारा नाला त्याचीही साफसफाई होणे बाकी आहे.

शहरातील मेन रोडच्या दुतर्फा असलेली गटार साफ झाली असली तरी ती गटार लहान असल्याने आणि त्याच भागातून पूर्वी नाला पाणी घेऊन जात असल्याने आजही पावसाळ्यात जास्त पाऊस झाला की, त्यादिवशी गटारात पाणी मावत नाही आणि या मेन रोडवर नालसदृश स्थिती निर्माण होते. म्हणून प्रशासनाने गटारे साफसफाई केल्या असल्या तरी नालासदृश पाणी या गटारांमधून जाऊ शकत नाही. म्हणून जी कामे सुरू आहेत, ती कामे वेगाने होऊन शहरातील सर्व भागातील नाले साफसफाई होणे आवश्यक आहे.

‘त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठावरील किंवा नाल्याच्या काठावर रहिवास करीत असलेल्या नागरिकांना नगरपालिका प्रशासनातर्फे सतर्क राहण्याबाबत नोटीस दिली असून पुराचे पाणी आपल्या घरात आल्यास आपण जबाबदार राहाल, असे कळवले आहे. यासोबतच शहरांमध्ये ज्या इमारती पडक्या झालेल्या आहेत, ज्या इमारतींचे काम जुने असून पावसाळ्यात पडू शकतात, अशा सर्व इमारतमालकांना भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून ही इमारत आपल्या स्तरावर पाडून आगामी काळातील धोका टाळावा, अशा आशयाचे लेखी पत्रही देण्यात आले आहेत.

नाले साफसफाई सुरू : मुख्याधिकारी अविनाश गांगोडे

दरम्यान नदीनाले साफसफाईसंदर्भात नगरपालिकेतील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ३ जेसीबीद्वारा नदी-नाले साफसफाईचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे होतील. तसेच नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून सतर्क करण्यात आले आहे आणि शहरातील पडकी इमारत असेल, अशा इमारतमालकांनाही लेखी पत्र देऊन ही इमारत पाडून घ्यावी, असे कळविण्यात आल्याचे सांगितले.

===Photopath===

290521\29jal_9_29052021_12.jpg

===Caption===

अरुण नगर शेजारून जाणाऱ्या नाल्यांमध्ये बाभळीचे झाड उभे असल्याचे दिसत आहे.

Web Title: River-cleaning work in Chopda city started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.