भविष्यातील पिढीसाठी नद्यांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:07+5:302020-12-15T04:32:07+5:30

आपण भारतीय लोक, जगातल्या प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेले लोक, जे पंचमहाभूतांची पूजा करतात, नद्यांना मातेसमान दर्जा देतात, पाण्यालाच जीवन ...

Rivers need to be maintained for future generations. | भविष्यातील पिढीसाठी नद्यांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे..

भविष्यातील पिढीसाठी नद्यांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे..

Next

आपण भारतीय लोक, जगातल्या प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेले लोक, जे पंचमहाभूतांची पूजा करतात, नद्यांना मातेसमान दर्जा देतात,

पाण्यालाच जीवन मानतात, आज त्याच नद्यांची आपण काय अवस्था करून ठेवली आहे? आज भारतभरातल्या नद्या मरणकळा सोसत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बराचसा प्रदेश नद्यांमुळे सिंचनाखाली आहे. आपल्या जळगाव जिह्यात जवळपास १४ मोठ्या नद्या आहेत. ज्यात आपण तापी, गिरणा, वाघुर, अंजनी, गूळ यांचे नाव घेऊ शकतो.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील तापी व गिरणा या दोन नद्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे. तापी नदीत भुसावळ शहरासह जळगाव एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे, तर गिरणा नदीतदेखील जळगाव शहराचे प्रदूषित पाण्यासह नदीपात्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे परिस्थिती बिकट होत जात आहे.

तापी अंदाजे १३३ किलोमीटर, तर गिरणा अंदाजे १५५ किलोमीटरचा प्रवास जळगाव जिल्ह्यातून करते. तापी नदीच्या पाण्यावर जिल्ह्यातील सुमारे

३ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे, तर गिरणेमुळे सुमारे दोन लाख हेक्टर जमिनीला लाभ मिळतो. मात्र, प्रदूषित पाणी व अवैध वाळू उपसा यामुळे या नद्या नामशेष होत जात आहेत.

जळगाव जिल्हा संपूर्ण देशात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नद्यांची होणारी वाताहत पाहता येणाऱ्या २० वर्षात जिल्ह्यात केळी हे पीकदेखील घेणे कठीण होणार आहे. कारण पाण्याची समस्या अधिकच बिकट होण्याची भीती आहे. केंद्र शासनाच्या भूजल स्रोत विभागाने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांमध्ये तापी नदीचा समावेश होता. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.

नद्यांचे अस्तित्व संपले म्हणजे नद्याकाठची संस्कृतीदेखील लयास जात असते. इतिहासात याचे अनेक उदाहरणे आहे. नद्यांचे अस्तित्वावरच जैवविविधता अवलंबून आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे प्रशासनासोबतच पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनीदेखील एकत्र येऊन नद्यांसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. वाळू उपशाचे प्रश्न बिकट झाल्यानंतर गिरणा काठावरील अनेक गावांमध्ये आता जनजागृती होऊन युवक वर्ग पुढे सरसावत असून, नदीला वाचविण्यासाठी आता एक चळवळ उभी राहत आहे. गिरणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात नद्यांसाठी चळवळ उभी राहत असून, आता यासाठी

सर्वच स्तरातून मार्ग काढणे गरजेचे आहे. २०१९-२०२० ह्या एक वर्षात १९३ भारतीय माणसे वाळू उपशाच्या कुठल्या न कुठल्या प्रभावाने मृत्युमुखी पडले आहेत.

रोजगारनिर्मितीच्या कोणत्याही संधी न चुकवता अधिकाधिक संधी निर्माण करीत आपण वाळूला पर्याय शोधू शकतो; मात्र आपण अमेरिकेसारख्या देशाचे धडे गिरवायला बघतो. मात्र त्यांच्याकडून आपल्याला धडे घेता येणार नाहीयेत. अमेरिकेसारख्या देशात साठे अमाप आहेत व लोकसंख्या कमी. शिवाय अमेरिकेनेच त्यांच्या महत्त्वाच्या नद्यांचे भाग संरक्षित करण्यासाठी १९६८ पासून वाइल्ड ॲण्ड सिनिक रिव्हर्स ॲक्ट अमलात आणला आहे हे विसरतो. याहीपलीकडे जाऊन भूजलाची परिस्थितीसुद्धा वारंवार धोक्याचा इशारा देणारी आहे. आपल्यालाच आपला रस्ता शोधावा लागणार आहे. त्यात नद्यांचे/पाण्याचे संवर्धन, कायदे काटेकोर पाळणे, लोकसहभाग, कल्पकतेने नवे पर्याय विकसित करणे हे सगळे आलेच. आपण नद्या संपवून प्रगती करत आहोत त्याला आपण विकास म्हणणार आहोत का? आता युवकांनी पुढे येऊन व्यापक नद्यांना वाचविण्यासाठी व्यापक जनमत तयार करत नद्यांना संवर्धित करणे गरजेचे आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना हे सांगणे गरजेचे आहे की, तुमच्या गाडीच्या बुलेटप्रूफ काचा खाली करून जरा बघा खरा धोकाबंदुकीचा नाही तर इथल्या दूषित पाण्याचा आहे. जोवर नद्या अविरल-निर्मल मुक्तवाहिन्या राहतील तोवरच आपले भविष्य आहे हे आपल्याला आता समजून घ्यावे लागणार आहे.

गिरीश घनश्याम पाटील,

संस्थापक, योगी

Web Title: Rivers need to be maintained for future generations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.