आरओ प्लांटवरील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:13+5:302021-05-30T04:15:13+5:30
वीजबिल न भरल्यास होणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा आरओ प्लांटला ...
वीजबिल न भरल्यास होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा आरओ प्लांटला देण्यात आलेला वीजपुरवठा अवैध असल्यामुळे तो शनिवारी खंडित करण्यात आला. ११ मे पासून तर २९ मे पर्यंतचे बिल न भरल्यास वेळप्रसंगी कारवाई करण्यात येईल, असा इशारा विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता डी.आर. कोल्हे यांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांसाठी अत्यल्प दरामध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरल्यास आरओ प्लांटचा शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम ११ मे पासून सुरू केला होता व या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसादही मिळत होता. मात्र, आरओ प्लांटसाठी घेण्यात आलेली वीज ही विद्युत वितरण कंपनीच्या वीजवाहिनीवरून अवैधरीत्या टाकण्यात आली होती. याबाबत तक्रार करण्यात आल्याने साकेगाव विद्युत वितरण कंपनी उपकेंद्राचे सहायक अभियंता डी.आर. कोल्हे यांनी घटनास्थळी भेट दिली व ज्या दिवसापासून या ठिकाणी वीजपुरवठा वापरला जात आहे, त्या तारखेपासून वीजबिल भरणा करावा, अन्यथा विद्युत कायदा १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.