पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:28 PM2019-07-02T21:28:21+5:302019-07-02T21:29:11+5:30

२० दिवसांपाूसन पाणीपुरवठा ठप्प

Road block due to water scarcity | पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

Next

धरणगाव : महिना लोटत आला तरी दमदार पाऊस न पडल्याने शहरासह तालुक्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहराला पाणी पुररवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहातील पाणी संपूर्णत: संपल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. अशात पाण्यासाठी आक्रोश करणाºया पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरवासीयांना फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने पालिकेवर नागरिकांनी रोष व्यक्त करुन अचानक रास्तारको केला.
तिघे आरक्षित आवर्तन संपले....
धरणगाव शहरासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने १८० दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते.पैकी एक आवर्तन डिसेंबर मध्ये हतनुर धरणातून तर दोन आवर्तन गुळ प्रकल्पातून फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घेतले होते. हल्ली गुळ प्रकल्पातही आवर्तन देण्याएवढे पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आक्रोश आंदोलन...
गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने शहरवासी पाण्यासाठी आक्रोश करीरीत आहे. २ रोजी सकाळी व्दारकादास विहीरीजवळ नागरीकांनी अचानक रास्तारोको आंदोलन करुन तिव्र संताप व्यक्त केला.जर या दोन दिवसात शहरवासीयांना पाणी मिळाले नाही तर नगरपापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बसणे अवघड होईल अशी चिन्हे दिसत आहे.
व्दारकादास विहीर ठरतेय संजीवनी...
शहरातील गांधी उद्यान लगत असलेल्या व्दारकादास (भांगकुवा) विहीरीने नेहमी दुष्काळी स्थितीत तारले आहे. आताही ही विहीर रात्रंदिवस शहराला पाणी पुरवठा करीत आहे. मात्र गावातील काही खाजगी टँकरधारक मनमानी भावाने पाणी विक्री करीत आहेत.यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हतनुरच्या पाण्याची प्रतिक्षा....
गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे (धरणागव तालुक्यात नाही) हतनुर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. ते पाणी धावडा डोहापर्यत केव्हा पोहचेल व केव्हा शहराला पाणी मिळेल अशी प्रतिक्षा न.पा.प्रशासनासह शहरवासीयांना आहे.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता.मात्र दुर्दैवाने धावडा डोहातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. धरणांमध्येही पाणी नसल्याने आवर्तन मिळणे शक्य नाही.हतनुरचे पाणी लवकरच तापी पात्रात पोहचेल, याची प्रतिक्षा आहे. पाणी पोहचल्याबरोबर पाणी पुरवठा केला जाईल. हल्ली शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.
- अंजली भानुदास विसावे,उपनगराध्यक्षा धरणगाव

Web Title: Road block due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.