रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:31+5:302021-04-30T04:21:31+5:30
होम आयसोलेशनची संख्या कमी जळगाव : निकष अधिक कडक केतल्यानंतर होम आयसोलेशनची संख्याही कमी झाली असून ७ ते ८ ...
होम आयसोलेशनची संख्या कमी
जळगाव : निकष अधिक कडक केतल्यानंतर होम आयसोलेशनची संख्याही कमी झाली असून ७ ते ८ हजारांवरील ही संख्या साडेसहा हजारांपर्यंत आली आहे. मध्यंतरी होम आयसोलेशनमधील रुग्ण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे समोर आल्यानंतर अखेर याबाबतचे निकष कडक करण्यात आले होते. ही संख्या आता ६६३५ वर गेली आहे.
तपासण्या वाढल्या
जळगाव : शहरात विविध ठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून तसेच रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी होत असल्याने शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. सरासरी १५०० पर्यंत चाचण्या एका दिवसात केल्या जात आहेत. यात तंत्रनिकेतनच्या मुख्य केंद्रावर नियमित चाचण्या सुरूच आहेत.
बेड स्थिती नियंत्रणात
जळगाव : शासकीय वैद्यकीय महााविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी बेड स्थिती नियंत्रणात असून रुग्णसंख्या घटल्याचे एक समाधानकारक चित्र असल्याची माहिती वॉर रूममधून समोर आली. १५ ते २० बेड सायंकाळी रिक्त होते. शिवाय येणारे रुग्णांची संख्याही कमी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शंभरावर रुग्ण
जळगाव : बाहेरील जिल्ह्यातील ११२ रुग्ण जळगावात उपचार घेत आहेत. बुधवारी ७ नवे बाधित आढळून आले होते. ही संख्या एकूण ९४४ वर पोहालचली असून यातील ८३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ११२ रुग्ण हे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.