मनपासमोरील खोदलेला रस्ता एकाच दिवसात चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:24+5:302021-01-13T04:37:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सध्या अमृत अंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यापैकी पाणीपुरवठा योजनेचे ...

The road dug in front of Manpas is shiny in one day | मनपासमोरील खोदलेला रस्ता एकाच दिवसात चकाचक

मनपासमोरील खोदलेला रस्ता एकाच दिवसात चकाचक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सध्या अमृत अंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यापैकी पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेच्या कामालाही गती आली आहे. शहराच्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर चाऱ्या व्यवस्थितपणे बुजविल्या जात नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसताना मनपासमोर खोदकाम झाल्यानंतर मात्र एकाच दिवसात तत्काळ दुरुस्ती करून खोदलेला रस्ता चकाचक केला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काय पाप केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भुयारी गटार योजनेच्या निविदेत खोदकाम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मक्तेदारावर सोपविण्यात आलेले नाही. त्यामुळे मक्तेदाराकडून किरकोळ दुरुस्तीदेखील केली जात नसल्याने खोदकाम झालेल्या चाऱ्या वाहनधारकांसाठी आता धोकेदायक ठरत आहेत. आठवडाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे या चाऱ्या वाहनधारकांसाठी अक्षरश: जीवघेण्या ठरल्या. अनेक भागांत झालेल्या चिखलामुळे वाहनधारकांचे अपघातदेखील झाले. मनपाच्या प्रशासकीय इमारतीसमोरदेखील भुयारी गटार योजनेचे काम झाले. मात्र, हे काम झाल्यानंतर दोनच दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मक्तेदार व मनपा प्रशासनाने या ठिकाणी दाखविलेली तत्परता अन्य ठिकाणी का दाखविली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्यांसाठी वेगळा तर मनपासाठी वेगळा न्याय का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेना नगरसेवकाकडून निषेध

शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपाच्या या दुटप्पी धोरणाचा सोशल मीडियाद्वारे निषेध व्यक्त केला आहे. मनपासमोर केलेले काम जर शहरभर केले असते तर सर्व अधिकारी अभिनंदनाच्या पात्र ठरले असते, असाही टोला नाईक यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टद्वारे केला आहे.

Web Title: The road dug in front of Manpas is shiny in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.