जळगावातील राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ‘नही’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:21 PM2018-01-16T12:21:19+5:302018-01-16T12:23:24+5:30

मोबदला अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ कोर्टात

On the road leading to Jalgaon National Highway's 'barrier' | जळगावातील राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ‘नही’चा खोडा

जळगावातील राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ‘नही’चा खोडा

Next
ठळक मुद्दे१० हेक्टरसाठी ८० कोटीच्या मोबदल्याला विरोधतरसोद -चिखली दरम्यान कामालाही विलंबनिकाल लागल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया होणार पूर्ण

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचे काम त्वरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असताना शहरातून जाणारा महामार्ग शहराबाहेर जाण्यासाठी करावयाच्या वळण रस्त्याची सुमारे १० हेक्टर जागाच अद्याप प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही.     
    या जागेच्या भूसंपादनासाठी केलेल्या अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ नेच (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण) उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने हे भूसंपादन रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आणखी एक-दोन महिने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता असून त्यानंतरच या वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल.
तरसोद -चिखली दरम्यानही विलंब
राष्टÑीय महामार्ग क्र.६च्या धुळे ते अमरावती दरम्यान  तीन टप्प्यात  करावयाच्या चौपदरीकरणासाठी २०१२ पासून प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात सातत्याने वेगवेगळे अडथळे येत गेल्याने हे काम अर्धवटच आहे.
 महाराष्टÑातील अमरावती ते धुळे या दरम्यानच्या महामार्गापैकी जळगाव जिल्ह्यात चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने कामाला वेगाने सुरूवात केली आहे. मात्र तरसोद ते फागणे या टप्प्याच्या कामाला अद्यापही सुरूवात झालेली नाही. मक्तेदाराकडून अद्याप कॅम्प उभारणीचेच काम सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मक्तेदाराकडून आढावाही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने तातडीने कामाला प्रारंभ केला आहे. मात्र या मक्तेदाराकडेच असलेल्या जळगाव शहराबाहेरील वळण रस्त्याच्या कामात भूसंपादनच झालेले नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. जळगाव शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग शहराबाहेरून वळविण्यासाठी तरसोदजवळील टीव्ही टॉवर पासून ते आव्हाणे शिवारातून थेट बांभोरीपर्यंत वळण रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कमिटीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करून अ‍ॅवार्डही घोषीत केले.
 या वळण रस्त्यासाठी सुमारे १० हेक्टर जमीन लागणार असून त्याच्या मोबदल्यापोटी या कमिटीने सुमारे ८० कोटीचे अ‍ॅवार्ड केले आहे. मात्र ‘नही’ने याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ही जमीन अद्यापही प्रशासनाच्या ताब्यातच आलेली नाही. त्यामुळे मक्तेदाराला या वळण रस्त्याचे काम सुरु करता आलेले नाही.
 शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे हा महामार्ग शहराबाहेरून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्या वळण रस्त्याच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम जास्त असल्याचा आक्षेप घेत ’नही’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आधीच समांतर रस्ते नसल्याने अपघात होत असताना हा मार्ग शहराबाहेरून जाण्याच्या कामातही ’नही’मुळेही अडथळा निर्माण झाला आहे. निकाल लागल्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल, दरम्यान, याबाबत ‘नही’च्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Web Title: On the road leading to Jalgaon National Highway's 'barrier'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.