सत्तासंघर्षात रस्ता रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:47 PM2018-08-17T15:47:35+5:302018-08-17T15:48:11+5:30
अमळनेरात कर भरूनही नागरिक सुविधांपासून वंचित
अमळनेर, जि.जळगाव : शहरातील धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्याला काही वर्षांपासून खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकाणनात रस्ता रखडल्याचा आरोप होत आहे.
पालिकेतील सत्ता संघषार्मुळे भुयारी गटारीचा प्रश्न न्यायप्रविष्ट म्हणून न्यायालयात प्रलंबित आहे आणि भुयारी गटार होत नाही तोपर्यंत रस्ते करू नये, असे आदेश शासनाने दिल्यामुळे शहरातील काही रस्ते रखडले आहेत.
धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाºया मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. काही वर्षांपासून खड्डे पडल्याने किरकोळ अपघात, पावसाळ्यात चिखल, डबके साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक अनेक वर्षांपासून पालिकेचे कर भरतात. असे असूनही त्यांना रस्ते, गटारींची मूलभूत सुविधा नाही, रस्त्यालगतचे गवत काढण्यात आले नाही. तसेच डासांचे प्रमाण वाढल्याने औषध किंवा पावडर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
नव्याने वसलेल्या कॉलनी परिसरात डांबरी रस्ते झाले. मात्र अनेक वर्षांपासून असलेल्या एलआयसी, विठ्ठलनगर भागातील रस्ते नादुरुस्त आहेत. लोकप्रतिनिधींनी भुयारी गटार राजकारण बाजूला ठेवून रस्ता विकसित करण्यासाठी अडथळे दूर करावेत आणि नागरिकाना सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.