चाळीसगावला रस्त्याची समस्या सुटली अवघ्या काही मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:09+5:302021-05-31T04:13:09+5:30

चाळीसगाव : सतत दुर्लक्ष झाल्याने समस्यादेखील सडतात, कुजतातही. पावसाळ्यात उगवून येणाऱ्या छत्र्यांप्रमाणे पुन्हा डोकेही वर काढतात. मात्र, आमदार मंगेश ...

The road problem to Chalisgaon was solved in just a few minutes | चाळीसगावला रस्त्याची समस्या सुटली अवघ्या काही मिनिटांत

चाळीसगावला रस्त्याची समस्या सुटली अवघ्या काही मिनिटांत

Next

चाळीसगाव : सतत दुर्लक्ष झाल्याने समस्यादेखील सडतात, कुजतातही. पावसाळ्यात उगवून येणाऱ्या छत्र्यांप्रमाणे पुन्हा डोकेही वर काढतात. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे याला फाटा मिळाला असून अनेक वर्षांपासूनच्या येथील जुना पाॅवर हाउस परिसरातील प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या अवघ्या काही मिनिटांत सुटली आहे. शनिवारी दुपारी निधीचे पत्र मिळाले आणि सायंकाळी भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाल्याचा अनुभव नागरिकांना मिळाला आहे.

शहरालगत पाॅवर हाउस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणाऱ्या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने या रस्ता दुरुस्तीची मागणी शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करीत होते. त्यातच मागील २ दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे हातमजुरी करणाऱ्या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने त्यावर पायी चालणेदेखील कठीण झाले होते. या समस्येमुळे मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते. ही सर्व अडचण घेऊन या त्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी आमदार चव्हाण यांची सकाळी भेट घेऊन समस्या मांडली.

स्थानिक विकास निधीतून डोहरवाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, सदानंद चौधरी, रोहन सूर्यवंशी, अनिल चौधरी, अमोल चौधरी, मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रेय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभू चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.

तत्काळ घेतला निर्णय

रस्त्याची जटिल समस्या आणि शेतकऱ्यांची प्रामाणिक तळमळ पाहून आमदार चव्हाण यांनी निधी देण्याचा तत्काळ निर्णय घेतला. पावसाळा तोंडावर आला असल्याने ठेकेदाराला पाच लाख रुपये निधीचे पत्र देऊन स्वतः पैशांची जबाबदारी स्वीकारत कामाला सायंकाळीच सुरुवात करण्याची सूचना दिली. आमदारांच्या या निर्णयामुळे उपस्थित शेतकरी भारावले. त्यांनी समाधानही व्यक्त केले. सायंकाळी या रस्त्याचे भूमिपूजन झाले.

===Photopath===

300521\30jal_2_30052021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव येथे जुना पॉवर हाऊस भागात रस्ता कामाचे भूमिपूजन करताना आ. मंगेश चव्हाण. सोबत राजेंद्र चौधरी, संजय पाटील, सदानंद चौधरी आदी

Web Title: The road problem to Chalisgaon was solved in just a few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.