रस्ता दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:06+5:302021-06-04T04:13:06+5:30
२५ टक्के उपस्थिती जळगाव : जिल्हा परिषदेत आता १५ टक्के उपस्थितीचे निर्बंध शिथिल करून २५ टक्के उपस्थिती करण्यात आली ...
२५ टक्के उपस्थिती
जळगाव : जिल्हा परिषदेत आता १५ टक्के उपस्थितीचे निर्बंध शिथिल करून २५ टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. यासह गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी अभ्यागतांना येण्यासही मनाई असल्याने तक्रारी सोडवायच्या कशा प्रश्न स्थानिक पातळीवर आहे.
३५०० आरटीपीसीआर
जळगाव : जिल्हाभरात सध्या दिवसाला सरासरी ३५०० आरटीपीसीआर चाचण्या होत असून, त्या वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ॲंटिजनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्या अधिक असाव्यात, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, सध्यातरी तशा चाचण्या जिल्ह्यात होत नसून हे प्रमाण बदलविण्यात येणार आहे.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
जळगाव : गेल्या तीन दिवसात मोकाट कुत्र्यांनी ५०च्या वर नागरिकांना चावा घेतला आहे. या नागरिकांनी जीएमसी येथे प्राथमिक उपचार घेतले आहे. यात काही बालकांचाही समावेश आहे. आता गंभीर जखमींना जीएमसीतच एआरसी इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे.