रस्ता सुरक्षा अभियानाचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:57+5:302021-01-18T04:14:57+5:30
कोरोना योद्धांचा उद्या सत्कार जळगाव : कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मंगळवार, १९ रोजी जिल्हा मेडिसीन डीलर ...
कोरोना योद्धांचा उद्या सत्कार
जळगाव : कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मंगळवार, १९ रोजी जिल्हा मेडिसीन डीलर असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. १९ रोजी केमिस्ट भवन येथे सकाळी ११ वाजता संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या दरम्यान हा सोहळा होणार आहे. यामध्ये रत्नागिरी येथे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अन्न निरीक्षक अनिल माणिकराव, आयएमएचे सचिव डाॅ. स्नेहल फेगडे, डॉ. किरण पाटील, डॉ. अमित भंगाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांनी केले आहे.
कवी नामदेव ढसाळ यांना अभिवादन
जळगाव : विद्रोही कवी तथा भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) अभिवादन केले. महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव, सचिन अडकमोल, बबलू शिंदे, प्रताप बनसोडे, रोहित गायकवाड, शकील पिंजारी, दिनेश पाटील, आशा भोसले, किरण अडकमोल, शंकर आरक, शेखर सोनवणे, हरीश शिंदे, सतीश गायकवाड, गोलू बोदडे, अश्फाक खाटीक, रफिक शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन
जळगाव : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याला पाठिंबा देण्यासाठी सोमवार, ११ जानेवारीपासून देशभरात धरणे आंदोलन सुरु केले आहे. देशातील ५५० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येत असून जळगाव येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ जानेवारीपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.