जळगावात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:20 PM2019-04-21T12:20:23+5:302019-04-21T12:21:47+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तांबापुरा, इच्छादेवी, मेहरुण, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, कंजरवाडा या भागात पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तांबापुरा, इच्छादेवी, मेहरुण, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, कंजरवाडा या भागात पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पथसंचलनात सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, कर्मचारी यांच्यासह २८० कर्मचारी, १९ अधिकारी, आरसीपीच्या तीन कंपन्या, एसआरपीची एक कंपनी सहभागी झाली होती. सकाळी ९ वाजता इच्छादेवी चौकापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. १०.३० वाजता संचलन संपले. शनी पेठ, जळगाव शहर व रामानंद नगर भागातील संवेदनशील भागातूनही संचलन काढले जाणार आहे.