भुसावळ शहरात होणार ट्रीमिक्स पद्धतीचे रस्ते

By admin | Published: June 21, 2017 01:48 PM2017-06-21T13:48:14+5:302017-06-21T13:48:14+5:30

शासनाकडे प्रस्ताव सादर, अटल अमृत योजनेत सहभागासाठी स्वतंत्र प्रय} असल्याची नगराध्यक्ष रमण भोळे यांची माहिती

Road to Trimmys in Bhusaval City | भुसावळ शहरात होणार ट्रीमिक्स पद्धतीचे रस्ते

भुसावळ शहरात होणार ट्रीमिक्स पद्धतीचे रस्ते

Next

 पंढरीनाथ गवळी/ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.21 : शहरातील  प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची बांधणी अत्याधुनिक अशा ‘ट्रीमिक्स’ पद्धतीने करण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते सुमारे 300 कि.मी.इतक्या अंतराचे असल्याची माहितीही त्यांनी प्रसंगी दिली.
भुसावळ पालिकेचा केंद्राच्या अटल अमृत योजनेत समावेश आहे. या योजनेतील सर्व कामांची निविदा प्रक्रिया पार पाडली जात आहे. साधारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अमृत योजनेच्या कामांना प्रारंभ होईल. या योजनेतील महत्त्वाचे म्हणजे शहराच्या चारही बाजुंनी जे आठ-दहा जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जमीनीखालून पाईप लाईन अंथरण्यात येणार आहे. ती पूर्ण अंथरुन झाल्यावरच शहरातील सर्व रस्त्यांची ‘ट्रीमिक्स’ पद्धतीने बांधणी केली जाईल, रमण भोळे म्हणाले. ट्रीमिक्स पद्धतीने रस्ते बांधणी बाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे या आधीच पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
300 कि.मी.अंतराचे रस्ते
भुसावळ शहराचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे जाळे वाढले आहे. प्रमुख मार्गासह शहरात सुमारे 300 कि.मी.इतक्या अंतराचे रस्ते आहेत या अशा सर्व रस्त्यांची बांधणी ट्रीमिक्स या नवीन अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. रस्त्याची कामे पाईप लाईन टाकून झाल्यावरच होतील.
 
असे आहेत शहरातील प्रमुख रस्ते..
तापीनदी यावलनाका (राहुलनगर) पासून ते नाहाटा महाविद्यालय चौफुली र्पयत जामनेर रोड. जवाहर नवोदय विद्यालयापासून ते यावलनाका तापीनदी र्पयत जळगाव रोड. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ािश्चन कब्रस्तान, अमरेज नाल्या र्पयत डॉ.बाबासाहेब आंबेडकररोड (आरपीडीरस्ता). सुभाष पोलीस चौकीपासून आशिया महामार्गावरील खडका चौफली मार्ग. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर महामार्गावरील सुंदरनगर र्पयत वरणगाव रोड,असे प्रमुख मार्ग आहेत.

Web Title: Road to Trimmys in Bhusaval City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.