आसोदा रेल्वेगेट ते प्रजापतनगर रस्ता होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:40+5:302021-02-08T04:14:40+5:30

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी : रेल्वे विभाग करून देणार रस्ता जळगाव- शहरातील असोदा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार ...

The road will be from Asoda Railway Gate to Prajapatnagar | आसोदा रेल्वेगेट ते प्रजापतनगर रस्ता होणार

आसोदा रेल्वेगेट ते प्रजापतनगर रस्ता होणार

Next

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी : रेल्वे विभाग करून देणार रस्ता

जळगाव- शहरातील असोदा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार असून, नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून महाराष्ट्र रेल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) नवीन रस्ता तयार करून दिला जाणार आहे. आसोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगरदरम्यान हा रस्ता होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. तसेच रविवारी महापौरांनी या रस्त्याच्या प्रस्तावित कामाबाबत पाहणीदेखील केली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी हे उपस्थित होते.

असोदा रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. रेल्वे रुळाला लागूनच असलेल्या रस्त्यावर पुढे काही इमारती असल्याने तूर्तास त्याठिकाणी सरळ आणि विस्तीर्ण रस्ता तयार करणे शक्य नाही. नागरिकांना वाहतुकीसाठी महाराष्ट्र रेल्वे इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून असोदा रेल्वे गेट ते सुनंदिनी पार्कपर्यंत ६० मीटरचा रस्ता करून दिला जाणार आहे. सध्या त्याठिकाणी सुरू असलेल्या कच्च्या रस्त्याची महापौरांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, एमआरआयडीसीचे व्यवस्थापक, अभियंता, मक्तेदार प्रतिनिधी बाला खटोड आदी उपस्थित होते. सध्या असलेला रस्ता पूर्णतः कच्चा असून रस्त्याची मोजणी मनपाच्या नगररचना विभागाकडून करण्यात आलेली आहे. महापौर, आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही लवकर करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: The road will be from Asoda Railway Gate to Prajapatnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.