रस्त्याचे काम अन् दोन्ही खांबांमुळे वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:32 PM2019-01-07T16:32:48+5:302019-01-07T16:37:40+5:30

नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Road work and the hinges of traffic due to both pillars | रस्त्याचे काम अन् दोन्ही खांबांमुळे वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याचे काम अन् दोन्ही खांबांमुळे वाहतुकीचा खोळंबा

Next
ठळक मुद्देभडगाव तालुक्यातील कजगाव येथे निर्माण झालाय वाहतुकीचा प्रश्नपथदिव्याचा व टेलिफोन खांब हटविण्याची आवश्यकतावाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारीही गरज

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी हे दोन्ही खांब तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहे
जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू झाले आहे. हे काम कजगाव या मुख्य बाजारपेठेतून मध्यभागातून जात आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या या कामास रहदारीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यालगत असलेले धनश्री व्यापारी संकुलासमोरील (पथदिव्यांचा खांब) व टेलिफोन खांब हे दोघे खांब रस्त्याच्या कडेला लागून असल्याने रहदारीचा खोळंबा झाला आहे.
याच मार्गावर काही अंतरावर एक ट्रान्सफार्मर आहे. रस्त्यालगत बसलेले काही हातगाडीचालक, काही किरकोळ विक्रेते यामुळे रहदारीसाठी मोठी अडचण येथे होत आहे. अनधिकृत रस्त्यालगत बसलेल्या या किरकोळ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मागे थाटला तर रहदारीचा प्रश्न सुटेल, मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांनी आपली दुकान रस्त्यालगत थाटली आहेत.
या सर्वच बाबीचा पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्तरित्या कारवाई केल्यास रस्त्याचे कामही सुरळीत व चांगले होईल. बरोबरच वाहतुकीची मोठी समस्या दूर होईल.
हातगाडी, लोटगाडी, किरकोळ विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारी वाहन या साऱ्यांचा बाजाराच दिवस उजाडल्यापासून रस्त्यावर भरत असतो. यामुळे कजगावात बाजार नसतानाही बाजार वाटतो. त्यात वाढलेली रहदारी यामुळे दिवसभर वाहनधारकांत शाब्दिक वाद होतात. हे वाद मिटवायला येथे खाकीच नाही. यामुळे खाकीचा धाकदेखील संपलेला आहे.
 

Web Title: Road work and the hinges of traffic due to both pillars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.