रेल्वे हद्दीतील रस्ते झाले खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 04:24 PM2020-10-11T16:24:10+5:302020-10-11T16:24:16+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : स्वच्छता पंधरवड्यातही पडला विसर
भुसावळ : कोरोना अनलॉकच्या प्रक्रियेनंतर हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे, मात्र शहरातील रेल्वे हद्दीतील फूटभर खोल खड्ड्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या भागातील वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये कमालाची नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छता पंधरवडा रेल्वे हद्दीत वृक्षारोपण तसेच इतर उपक्रम घेऊन साजरा केला. मात्र खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा रेल्वे प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न रेल्वे हद्दीतील रस्ता वापर करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
रेल्वे प्रशासन आपल्या हद्दीमध्ये अगदी तसूभरही घाण पडू देत नाही. तसेच गुणवत्तापूर्ण कामे करणे हे नेहमीच रेल्वे प्रशासनाची जमेची बाजू राहिलेली आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने जणू रेल्वे हद्दीमध्ये विकास कामाचा सपाटाच लावला होता. मात्र सद्य:स्थितीत रेल्वे प्रशासन उदासीन झाल्याचे निदर्शनास येत आहे. डॉ.आंबेडकर मार्ग हासुद्धा रेल्वे प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचेही काम लवकरात लवकर सुरू व्हाव,े अशी अपेक्षा या रस्त्याचा वापर करणाºया आठ ते दहा हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना आहे.
सद्य:स्थितीत रेल्वे हद्दीतील विशेषत: स्टेशन रोडवरील रस्त्यांची शेतातील रस्त्यापेक्षाही बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे संबंधित आधिकाºयांनी दखल घेत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.