चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 08:27 PM2020-08-25T20:27:09+5:302020-08-25T20:27:28+5:30
जळगाव : मी या एरियाचा दादा आहे, असे म्हणत राहूल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने अग्रवाल चौकात चाकूचा धाक ...
जळगाव : मी या एरियाचा दादा आहे, असे म्हणत राहूल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने अग्रवाल चौकात चाकूचा धाक दाखवून अनेकांकडून पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर राहूल याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने चार दिवासाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत रामेश्वरलाल बन्सीधर सैनी (४५, रा. राजस्थान, ह.मु. जिजाऊ नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,अग्रवाल हॉस्पिटलजवळ बालाजी पॉवर टूल नावाचे तीन वर्षांपासून दुकान आहे. २४ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राहुल सुरेश हटकर हा एका अनोळखी मुलासोबत सैनी यांच्या दुकानात आला. रामेश्वरलाल यांना धमकावत ५०० रुपयांची मागणी केली. यावर सैनी यांनी नकार दिल्याने राहुल हटकरने शिवीगाळ करून मी या एरियाचा दादा आहे असे म्हणत चाकूचा धाक दाखविला, त्यामुळे सैनी यांनी घाबरुन खिश्यातील २०० रुपये दिले. गेल्या आठदिवसांपुर्वी देखील घडला होता.
इतरांकडूनही लूट
याच पध्दतीने संशयित राहुल हटकर याने चाकूचा धाक दाखवत प्रकाश छत्रमल राठी रा. वाघनगर यांच्याकडून १ हजार रुपये, सुरेशकुमार सैनी यांच्याकडून ४ हजार, किशोर रामगोपाल प्रजापत यांच्याकडून १० दिवसांपुर्वी ४०० रुपये घेतले तर जगदीश प्रसाद सैनी व छगन श्रीरामचंद्र सैनी यांना सुध्दा चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली होती. वेगवेगळ्या नागरिकांकडून धमकावून ६ हजार १०० रुपये त्याने जबरीने लुटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर हटकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.शेख यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.