बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट; अमळनेरनजीक मध्यरात्रीचा थरार

By संजय पाटील | Published: March 24, 2023 02:56 PM2023-03-24T14:56:05+5:302023-03-24T14:56:37+5:30

नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Robbery at petrol pump at gunpoint; The thrill of midnight near Amalner | बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट; अमळनेरनजीक मध्यरात्रीचा थरार

बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट; अमळनेरनजीक मध्यरात्रीचा थरार

googlenewsNext

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेरनजीक डांगर शिवारातील पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटून नेले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली.

डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जण आला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्याच्याकडील बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल- डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. त्याचवेळी एक जण चारचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला. या लुटारूने त्याच्या त्या वाहनाच्या डीकीला लाथा मारून चालकास बाहेर निघण्यास भाग पाडले. त्यालाही बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली व त्याच्याजवळ असलेले पाकीट हिसकावून तो अमळनेर रस्त्याकडे गेला. त्याचवेळी त्याचा साथीदार मोटरसायकल घेऊन आला. दोघे मोटरसायकलने धुळ्याकडे पसार झाले.

पेट्रोलपंपावरील कर्मचारी नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार व डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून नऊ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये या चोरट्याने हिसकावून नेले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

Web Title: Robbery at petrol pump at gunpoint; The thrill of midnight near Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी