मुक्ताईनगर तालुक्यात मालट्रकवर दरोडा, गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:23 PM2018-12-10T15:23:49+5:302018-12-10T15:26:57+5:30
मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली बेलासवडी रस्ता दरम्यान धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा टाकून ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली बेलासवडी रस्ता दरम्यान धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा टाकून मालट्रक लुटली. दरोडेखोरांनी ट्रकचालकाच्या पोटात चाकू घातला, तर क्लिनरच्या तोंडात दोन गोळ्या झाडल्या. सिनेस्टाईल दरोड्यातील जखमी क्लिनरला उपचारास इंदूर (मध्य प्रदेश) येथे हलविण्यात आले आहे. गोळीबार करून दरोडा घातल्याच्या या घटनेत कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे तपासाचा मार्ग शोधत आहेत, तर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी जळगाव येथून घनस्थळाकडे निघाले आहेत.
दरोडेखोरांनी क्लिनर अलीम सलीम शेख (वय २५, रा.अकोला) याच्या तोंडात दोन गोळ्या झाडल्या आहेत. त्याच्या तोंडातून एक गोळी बाहेर पडली. बºहाणपूर येथे प्रथमोपचार करून त्यास इंदूर येथे हलविण्यात आले आहे, तर चालक मोहंमद इलियास मुक्तार शेख (वय २५, रा.अकोला) याच्या पोटात चाकू मारला गेला, त्यावर अंतुर्ली येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत आहे. दरम्यान, चालकासही पुढील उपचारासाठी बºहाणपूर येथे हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री काळ्या रंगाच्या चारचाकीमधून पाचच्या संख्येतील दरोडेखोरांनी अंतुर्ली बेलासवडी दरम्यानच्या रस्त्यावर धामणदे फाट्यालगत अकोला येथून इंदूर जाणाऱ्या माल ट्रक (क्रमांक एमपी-०९-सीएफ-९६७६) यास थांबवून ट्रकचालक व क्लिनरवर धाव बोलला. ड्रायव्हरच्या पोटात चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले, तर उजव्या बाजूने हल्ला चढविणाºया हल्लेखोराने क्लिनर अलीम याची आरडाओरड पाहता थेट त्याच्या तोंडातच गोळ्या झाडल्या. तपासणी नाके चुकवून चोरट्या मार्गाने वाहतूक करणाºया या वाहनचालक व क्लिनरच्या जीवावर ही आडमार्गाची वाहतूक बेतली तर कमी वर्दळीच्या रस्त्यावर दरोडेखोरांनी सावज घेरले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर रावेर, मुक्ताईनगर, बºहाणपूर या भागात नाकेबंदी लावण्यात आली आहे. या भागात हॉटेल व धाब्यावर कसून तपासणी करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे यांनी दिली.