रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट, ४७ हजार रुपये घेऊन चोरटे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:46 PM2019-02-23T21:46:06+5:302019-02-23T21:46:21+5:30
एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्गावरील घटना
एरंडोल - राष्ट्रीय महामार्गावरील एम. जी. शहा पेट्रोलपंपावर दोन जणांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ४७ हजार ६०० रुपयांची लूट करून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भालगाव शिवारात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोलपासून येथून चार किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. सहावर धारागीर गावानजीक असलेल्या या पंपावर शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक रवींद्र हैबतराव पाटील व नीलेश पाटील हे कामावर असताना पेट्रोल आहे का अशी विचारणा करीत दुचाकीने आलेल्या दोन अज्ञातांंनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रवींद्र पाटील यांना पंपाच्या कार्यालयात नेले. तेथून त्यांनी ४७ हजार ६०० रुपये रोकड लंपास केली.
घटनेतील आरोपींनी व्यवस्थापक व त्याच्या साथीदारास कार्यालयाच कोंडून कुलूप लावले व रोख रक्कम घेऊन घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. परंतू दरोडेखोर सापडले नाही.
रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध शनिवारी पहाटे २ वाजता जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण हजारे हे तपास करीत आहेत.