अनाथ ‘रोहन’ला पोहे विक्रेत्या महिलेकडून आईचा ममता
By admin | Published: May 14, 2017 04:24 PM2017-05-14T16:24:12+5:302017-05-14T16:24:12+5:30
‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे
महेंद्र रामोशे / ऑनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 - ‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे. मात्र आईचे निधन झाल्यानंतर जर मावशीही नसेल तर जन्मलेल्या बाळाचे संगोपन कोण करेल, नातेवाईक! आणि नातेवाईकांनी ही जर पाठ फिरवली तर अशा दुर्देवी बाळाची रवानगी अनाथ आश्रममध्ये केली जाते. मात्र अशाच रोहन पाटील या दुर्दैवी बाळाचे संगोपन येथील साई पोहा विक्री करणा:या सुनंदा गोपाळ झारे या गेल्या नऊ वषार्ंपासून करीत आहेत. रोहनला आईची ममता देऊन त्याचे चांगल्या पद्धतीने संगोपन त्या करीत आहेत, स्वत:ला चार मुलं असूनही रोहनच्या संगोपनात तसुभरही कमी न करणा:या या आईचा रोहनलादेखील तेवढाच लळा लागला आहे.
येथील बसस्थानक परिसरात साई पोहे नावाने पोहे विकणा:या सुनंदा गोपाळ झारे यांचा संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. सुनंदा झारे आणि गोपाळ झारे यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. दुकानावर काम करणा:या कारागिराच्या बहिणीचा म्हणजेच शीतलचा रोहन पाटील हा मुलगा. रोहनच्या आईचे अल्पवयात लग्न झाल्यामुळे ‘प्री मॅच्युर्ड’ अवस्थेत रोहनचा जन्म झाला. शीतलवर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र रोहनच्या जन्मानंतर दोन दिवसांनी शीतलचा मृत्यू झाला. त्यानंतर रोहनला ना त्याच्या वडिलांनी नेले ना नातेवाईकांनी. शेवटी सुनंदा झारे यांनी या तीन दिवसांच्या मुलाला आपल्या घरी नेले. जैन डॉक्टराकडून त्याच्यावर उपचार केल. जन्म झाल्यानंतर न पुसता कपडय़ात गुंडाळून ठेवण्यात आल्याने रोहनची त्वचा खराब झाली होती.
रोहनने जन्म देणा:या आईला पाहिलेले नाही. त्यामुळे सुंदना झारेच आपल्या ख:या आई आहेत, असं त्याला आजही वाटतं. कारण झारे यांनी देखील रोहनच स्वत:च्या मुलासारखे संगोपन केलं आहे आणि करीत आहेत, रोहनचा जन्म 2008 या वर्षी झाला. आज तो नऊ वर्षाचा आहे. रोहनच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याने त्याला सुदृढ मुलांसारखे चालता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर चांगल्या डॉक्टराकडून उपचार सुरु आहेत. रोहनला शहरातील नामांकित शाळेत दाखल करून शिक्षण दिले जात आहे.
सध्या तो इयत्ता तिसरीत असून चागंले गुण देखील मिळवत आहे.
सुनंदा झारे यांना सचिन नावाचा मुलगा आहे आणि तीन मुली आहेत. त्यानी देखील रोहनला आपला लहान भाऊच मानलं आहे. त्यामुळे रोहनला हाच आपला परिवार आहे असे वाटतं. कालौघात रोहन जसा मोठा होईल तसे त्याला आपल्या जन्माची दूर्देवी कहाणी कळेल तेंव्हा त्याला झारे परिवाराविषयी अधिक आत्मीयता वाटेल आणि पुन्हा एकदा तो सुनंदा झारे यांना मायेची मिठी मारेल पण तोपयर्ंत सुनंदा झारे या आपल्या आईचे कर्तव्य पार पाडत राहतील.