रोहिंग्या मुस्लिमांवरील अन्यायाविरोधात जळगावात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:20 PM2017-09-12T12:20:46+5:302017-09-12T12:24:09+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन
Next
ठळक मुद्देसमाजवादी पार्टीतर्फे एकदिवसीय धरणे म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराचा निषेध
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच रोहिंग्या निर्वासितांना मदत व सहकार्य करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे सोमवार, 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यात समाजवादी पार्टीचे कोअर कमिटी चेअरमन साजीद शेख, जिल्हाध्यक्ष रागीब अहमद, महानगराध्यक्ष अशफाक पिंजारी, युवाजनसभा महानगराध्यक्ष सैय्यद दानिश अहमद, रईस बागवान, रफियोद्दीन खान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. याबाबत जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.