शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला; रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, सांगितली हल्ल्याची आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 01:07 PM2021-12-28T13:07:06+5:302021-12-28T13:09:09+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला.
मुक्ताईनगर, जि. जळगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे. तीन दुचाकीवरून सात जण आले यात तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसऱ्या च्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.
एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहीन, असेही खडसे यांनी सांगितले.
राजकीय वैमनस्यातून शिवसेना पदाधिकार्यांनी केला हल्ला
राजकीय वैमनस्यातून, वादातून शिवसेना पदाधिकार्यांनी हा हल्ला केला असे सांगत हल्ला करणार्यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली. यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई या तीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे खडसेंनी सांगितले.