एकनाथराव खडसेंना टाळून रोहिणी खडसेंना उमेदवारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:04 AM2019-10-03T00:04:37+5:302019-10-03T00:05:45+5:30

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे विधीमंडळ सभागृहात आले तर होणारी पक्षांतर्गत संभाव्य अडचण आणि त्यांची उमेदवारी कापल्यास त्यांच्याकडून होणारे ...

 Rohini Khadse nominee to avoid Eknathrao Khadse? | एकनाथराव खडसेंना टाळून रोहिणी खडसेंना उमेदवारी?

एकनाथराव खडसेंना टाळून रोहिणी खडसेंना उमेदवारी?

googlenewsNext


मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे विधीमंडळ सभागृहात आले तर होणारी पक्षांतर्गत संभाव्य अडचण आणि त्यांची उमेदवारी कापल्यास त्यांच्याकडून होणारे उपद्रव मूल्य लक्षात घेता त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी भाजपने चालविली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
याबाबत खडसे कुटुंबीयांमध्ये चर्चादेखील घडली असल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात खडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही सायंकाळपर्यंत काहीही माहिती देणे टाळले. तर खडसेंना राज्यपाल पदही देण्याची चर्चा आहे. तर बुधवारी सकाळपासून खासदार रक्षा खडसे मुंबईत आहेत. त्यांनी दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे समजते. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समजते. रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका खडसे परिवारातून घेतली जाईल, असा कयास आहे. दरम्यान, हा तिढा सुटताच भाजपची दुसरी अंतिम यादी जाहीर होईल, असाही मतप्रवाह आहे. तर खडसे हे रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत असल्याचेही समजते.

 

Web Title:  Rohini Khadse nominee to avoid Eknathrao Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.