लेकीच्या कारवर हल्ला, मुंबईला निघालेल्या एकनाथ खडसेंनी नाशिकहूनच वळवली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:20 PM2021-12-27T22:20:17+5:302021-12-27T23:38:49+5:30

रोहिणी खडसे-खेवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम अटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला.

Rohini Khadse's car attacked, police rushed to the spot in muktainagar | लेकीच्या कारवर हल्ला, मुंबईला निघालेल्या एकनाथ खडसेंनी नाशिकहूनच वळवली गाडी

लेकीच्या कारवर हल्ला, मुंबईला निघालेल्या एकनाथ खडसेंनी नाशिकहूनच वळवली गाडी

googlenewsNext

मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर २७ रोजी रात्री हल्ला झाला. त्या कारमधून जात असताना  मोटरसायकलस्वार अज्ञातांनी हल्ला करून कारची काच फोडत गाडीचे इतर नुकसान करुन पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास तालुक्यातील माणेगाव ते कोथळी दरम्यान  घडली. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यात त्यांना काहीही इजा झाली नाही. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगदेव येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगरकडे घरी परत येत असताना माणेगाव फाट्यावर अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या वाहनावर ( एमएच १९/ सी सी १९१९)र समोरून हल्ला केला. गाडीवर रॉडने वार केल्याचे सांगितले जात आहे. यात वाहनाचा दर्शनी काच फुटला आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे ज्या बाजूने वाहनात दर्शनी बाजूला बसल्या होत्या, त्याच बाजुचा काच फुटला आहे. सुदैवाने रोहिणी खडसे व ड्रायव्हर या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. रात्री उशिरा पर्यंत याबाबत घटनास्थळी तपासकार्य सुरू होते.

राजकीय वादाबाबत चर्चा
दोन दिवसांपासून खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर बदनामी आदी आरोप करीत गुन्हे दाखल केले आहे. एकूणच राजकीय वातावरण मुक्ताईनगर तालुक्यात तापले असताना ही घटना घडली. यामुळे या घटनेला राजकीय किनार तर नाही ना? अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे.

रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी
ही घटना घडल्यानंतर रोहिणी खडसे या आपल्या घरी पोहचल्या असता लगेचच समर्थकांनी एकच गर्दी केली. स्वत:ला सावरत  त्यांनी बराच वेळ थांबून असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घराबाहेर येऊन घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा  मंदाकिनी खडसे व स्वीय सहायक योगेश कोलते हे या ठिकाणी आले. याप्रसंगी कोलते यांनी रोहिणी खडसे यांची मनस्थिती ठिक नसल्याने आज गुन्हा दाखल केलेला नाही, मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांनी जमावे असे आवाहन केले. आमचा लढा कोणत्या पक्षा विरुद्ध नसून प्रवृत्तींविरुद्ध आहे तसेच विधानसभेत रडक्या आवाजात सुरक्षा मागणाऱ्यांनी तर अशा भ्याड हल्ल्याचे आदेश दिले नाही ना? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. प्रशासन व सरकार त्यांचे काम करेल, कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन कोलते यांनी केले. दरम्यान एकनाथ खडसे हे मुंबईला जात असताना घटना कळताच नाशिक येथून मुक्ताईनगरकडे परतले.

Web Title: Rohini Khadse's car attacked, police rushed to the spot in muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.