रोहित काळे करणार भारताचे प्रतिनिधित्व...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:48+5:302021-05-21T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्राच्या व्हर्च्युअल परिषद २८ ते ३१ मे या कालावधीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्राच्या व्हर्च्युअल परिषद २८ ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून जळगाव जिल्ह्यातील रोहित पंढरीनाथ काळे या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.
२८ ते ३१ मे रोजी होणाऱ्या आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्रांच्या आभासी परिषदेसाठी आशियातील सर्व देशातील दोन हजार जागतिक युवा नेत्यांची निवड होणार होते. त्या पैकी एक महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील रोहित पंढरीनाथ काळे यांची ७ हजार ३१७ मधून निवड झाली आहे. भारतीय प्रतिनिधी म्हणून ही निवड करण्यात आली. परिषदमध्ये कोरोना आणि घसरत असलेली अर्थव्यवस्था सारख्या अनेक सद्यस्थितीच्या विषयांवर चर्चा होणार आहे. रोहित काळे हा संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक यामध्ये प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही परिषद १५ जूनला होणार आहे.