शिरसोलीतील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी रोहित्राचे सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:34 PM2020-07-21T12:34:04+5:302020-07-21T12:34:04+5:30
शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने ...
शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने या समस्येच्या कायमस्वरूपी निवारणासाठी नवे रोहित्र मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार शनिवारी तीन ठिकाणच्या जागांची पाहणीदेखील करण्यात आली.
शिरसोली प्र.न.येथील चिंचपुरा, पाटीलवाडा, वाणी गल्ली या भागात विज पुरवठा करण्यासाठी पाचोरा रस्त्यावर स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले आहे. मात्र या रोहित्रावर अतिरिक्त दाब असल्याने या महिन्याभरात तीन वेळा रोहित्र जळाले आहे. गुरुवारी सकाळी हे रोहित्र निकामी झाल्यानंतर या भागातील नागरिक तब्बल तीन दिवस अंधारात होते. यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना होती. यासंदभार्तील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.
वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुलक्षणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, प्रणय सोनवणे यांनी या रोहित्रावरील भार कमी करण्यासाठी स्वतंत्र रोहित्र तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार आमदार निधीतून या कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. शनिवारी सकाळी वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं.सदस्यांनी तीन ठिकाणी रोहित्रासाठी जागांची पाहणी केली. त्यानुसार पाटीलवाडा, विठ्ठल मंदिर परिसर व अन्य एका ठिकाणी रोहित्राच्या जागेसाठी पाहणी करण्यात आली. या दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविण्यासाठी सर्वसम्मती झाली.
येत्या महिनाभरात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे वीज कंपनीचे अभियंता सुलक्षणे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना सांगितले.
विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविल्यानंतर या भागातील टॉवर व पिठाच्या गिरणीचा लोड या नवीन रोहित्रावर टाकण्यात येणार आहे. तसेच चिंचपुरा व उर्वरित भागाचा लोड हा पाचोरा रस्त्यावरील रोहित्रावर कायम ठेवण्यात येणार आहे.
आकडेधारकांविरूद्ध मोहिम
या भागात आकडेधारकांची संख्या जास्त असल्याने त्याचा अतिरिक्त दाब निर्माण होऊन रोहित्र वारंवार निकामी होत असते. त्यामुळे आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. त्यानुसार वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेधारकांविरूद्ध मोहिम राबविली. मात्र आधीच वीज गायब असतांना ही मोहिम राबविणाºया वीज कंपनीच्या पथकाला नागरिकांच्या संतापाला समोरे जावे लागले.
लोकप्रतिनिधींबद्दल नागरिकांचा रोष
रोहित्राअभावी तब्बल तीन ते चार दिवस नागरिकांना अंधारात रहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना होत्या. या दरम्यान ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील व प्रणय सोनवणे वगळता वीज नसलेल्या वॉडार्तील ग्रा.पं.सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी साधे ढुंकूनही न पाहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.