ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी येथे दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:07 PM2018-03-01T22:07:44+5:302018-03-01T22:07:44+5:30
ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी, ता.जळगाव येथे दोन गटात गुरुवारी सकाळी वाद होऊन दंगल उसळली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १ : ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी, ता.जळगाव येथे दोन गटात गुरुवारी सकाळी वाद होऊन दंगल उसळली. कुºहाड, लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याने यात दोन्ही गटाचे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यात मावळत्या सरपंचाचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या बारा जणांना ताब्यात घेतले असून गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नंदगाव फेसर्डी येथे दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात गेल्या २० वर्षापासून सरपंच असलेले शांताराम चंद्रकांत सोनवणे (वय ६०) यांचा भूषण गुणवंतराव पवार यांनी पराभव केला. यावेळी सरपंच पदाची थेट निवड होती. भूषण पवार हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले. सोनवणे गटाचा पराभव झाला. निकाल लागल्यानंतर सायंकाळी सोनवणे व पवार गटात अंतर्गत धूसफूस झाली होती, मात्र तो वाद जागेवर मिटला होता.
एका गटाचा पराभव तर दुसºया गटाचा विजय झाल्याने दोन्ही गटात बुधवारी सायंकाळी वाद झाल्यानंतर हा वाद गुरुवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा उफाळून आला. गावातील मुख्य चौक व शाळा परिसरात दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक वाद व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटाचे २० ते २५ जण एकमेकाच्या अंगावर चालून आले. डोक्यात लाठ्या, काठ्या तसेच लोखंडी रॉड टाकण्यात आले. एकाने तर घरातून कुºहाड आणून दोन तीन जणांवर हल्ला केला. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले.
या घटनेतील माजी सरपंच शांताराम चंद्रकांत सोनवणे, त्यांचा मुलगा भाऊसाहेब शांताराम सोनवणे (वय २७), स्वप्नील शांताराम सोनवणे (वय २४), ज्ञानेश्वर वासुदेव सोनवणे व विकास गोकुळ सोनवणे यांना खासगी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे तर प्रतिस्पर्धी गटाचे रामनाथ पंडित पाटील, राजेंद्र आधार पाटील, पिंटू पुजाराम पाटील व विरेंद्र पांडूरंग पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी राजेंद्र पाटील यांना जास्त मार लागल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.