संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागेल

By admin | Published: June 5, 2017 05:05 PM2017-06-05T17:05:02+5:302017-06-05T17:05:02+5:30

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांची जळगावात प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना..

The role of struggle will have to be proved | संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागेल

संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागेल

Next

 प्रादेशिक साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना ते म्हणतात, मराठवाडा साहित्य परिषद म्हणजे निजामशाही कारभार, विदर्भ साहित्य परिषद म्हणजे भोसले संस्थान आणि पुणे साहित्य परिषद म्हणजे पेशवाई तर कोमसाप हे स्वतंत्र राज्य असल्याची संस्थानशाही प्रचलित असल्याने त्या त्या दरबारचे मानपान ओघाने आलेच, यात होतं काय की, साहित्याने माणूस माणसाशी जोडण्याची प्रक्रिया वगळता सर्व प्रकारचे राजकारण यात दिसून येते. त्यात अभ्यासक्रमात आपल्या जवळच्या लेखकांच्या पुस्तकाची वर्णी लावणे, एकमेकांचे हितसंबंध जपणे, दर्जा नसतानाही ओळखी-पाळखीच्या लोकांची पुस्तक छापून आणणे साटेलोटे करून पुरस्कारांची खिरापत वाटणे यासारखे भ्रष्टाचार हे राजकारण्यांना लाजवतील इतके विपुल आहेत. हे तर वाईट आहेच पण याच्याविरोधात कुणीही भूमिका घेत नाही, हे अधिक वाईट आहे. भूमिका न घेणे हे तर सगळ्यात मोठे कट कारस्थान आहे. 

सार्थ अभिमान हवा
आपल्याकडे आदर्श योजना राबवाव्यात, असं सगळ्यांना वाटतं. पण त्यासाठी आपण विरोधात उभं ंराहायला हवं, हे त्यांच्या गावीही नसतं. जे काय करायचं ते त्या त्या विषयाच्या प्रतिनिधींनी पदाधिका:यांनी करावे असा आंधळा आदर्शवाद आपण हिरिरीने मांडतो, पण त्यासाठी संघर्षाची तयारी नसते. आंदोलनात उतरणे, लढायला सिद्ध होणं हे आमचं काम नाही, अशी आमची ठाम समजूत आहे. ही मानसिकता बदलायला हवी असा विचारही आम्हाला करावासा वाटत नाही हे या राज्याच्या भाषा संस्कृतीचे दुर्दैव आहे. इतर राज्यात पाहा तमीळ, तेलुगू, मद्रासी, मल्याळम् या भाषिकांना आपल्या मातृभाषेबद्दल किती पराकोटीचा अभिमान आहे, त्यांच्या लोकसंस्कृती, लोककला यांच्या संवर्धनासाठी तेथील राज्य सरकार आíथक तरतूद करतात.तेथील कलावंत आणि समाज त्यासाठी काम करायला सरकारला भाग पाडते. आमच्याकडे तर राजकीय लोकांची आश्वासनेही आम्हाला भुलविण्यास पुरेशी आहेत, संस्कृती वगैरेही काय सरकारची जबाबदारी आहे होय, असं आम्हाला आणि सरकारला किंवा सरकारला म्हणून आम्हाला वाटतं, पटतं म्हणून मग त्यासाठी आंदोलन वगैरे काही करायचं असतं, हे आम्हाला वाटतचं नाही.
साहित्य हे बहुजन हिताचं असायला हवं, हे सांगण्यात मार्क्‍स, आगरकर, सावरकर, शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी यासाठी आपली हयात वेचली. समतेचा विचार रुजावा, समाज प्रगल्भ व्हावा म्हणून परिश्रम घेतले आणि आम्ही काय करतो तर दलित बांधवांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा असे बिनदिक्कत जाहीरपणे बोलतो..का बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजासाठी काहीच केलेलं नाही, संविधान हे त्यांनी फक्त दलितांसाठी मांडलं आहे का? असे सुशिक्षित म्हणवतो ना आपण स्वत:ला मग ही कोणती वृत्ती. तर ही मूठभर ब्राrाण्यवादी विचारसरणी आणि त्यांचे रंजनवादी साहित्य. जे माणसा माणसात भेदभाव करताना दिसतात. नकोय आम्हाला असलं पठडीतलं साहित्य आणि त्याच्या भाषेचा प्रमाणवाद जे आमच्या येणा:या पिढय़ा बर्बाद करतील असं भयावह चित्र आम्हाला दिसत असूनही आम्ही त्याकडे सोईस्कर डोळेझाक करण थांबायला हवे आहे.
याकरिता प्रादेशिक स्तरावर साहित्य, कला संमेलने आयोजित करायला हवी. खान्देशला केशवसूत, बालकवी, बहिणाबाई, दु.आ. तिवारी, भालचंद्र नेमाडे, ना.धों महानोर अशी उज्ज्वल परंपरा आहे इथल्या साहित्यिक, कलावंतांनी एकत्र येऊन घटक संस्थेची स्थापना करावी आणि त्यासाठी महामंडळाची जी काही मदत हवी असेल, ती मंडळ नक्की करेल. आपण म्हणतो साहित्य, सांस्कृतिक संस्था ह्या असाहित्यिक, व्यापारी यांच्या हातात आहेत. पण मग या त्यांच्या हातात दिल्या कुणी, साहित्यिकांच्या उदासीनतेमुळेच ना? तुम्हाला जे खटकतं ते तुम्हीच बदलवू शकता. त्यासाठी संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागले, तरी उतरा की मैदानात. आपण व्यक्तिगत प्राप्तीसाठी लढतोच ना मग इथं भाषा, संस्कृती व कलेच्या दर्जासाठी लढावं लागत असेल, समतेसाठी आंदोलन करायची तयारी ठेवली तर संवर्धन कोण रोखू शकेल?
-अस्मिता गुरव 

Web Title: The role of struggle will have to be proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.