पाचोरा बसस्थानकाच्या छतावरील तावदाने कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:21+5:302021-06-29T04:13:21+5:30
मागील शासनाच्या काळात आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा बसस्थानकाचे सुशोभिकरण करण्यासाठी १ कोटी ३० लाख मंजूर करून आणले. प्रत्यक्ष ...
मागील शासनाच्या काळात आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा बसस्थानकाचे सुशोभिकरण करण्यासाठी १ कोटी ३० लाख मंजूर करून आणले. प्रत्यक्ष कामही वर्षभरात पूर्ण झाले. मात्र बसस्थानकाच्या छतावरील तावदाने पाऊस व वाऱ्यामुळे दि. २७ च्या रात्री ८ चे सुमारास कोसळले. सुदैवाने प्रवासी वाहतूक मंदावल्याने व प्रवासी नसल्याने जीवितहानी किंवा नुकसान टळले.
ठेकेदाराने जुन्याच स्ट्रक्चरवर फिनिशिंग करून सुशोभीकरण केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. याबाबत स्थानक प्रमुखांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळून वरिष्ठांनाच माहिती असल्याचे सांगितले. दरम्यान संबंधित ठेकेदाराने मूळ ढाचालाच फिनिशिंग करून सुशोभिकरण केल्याने कामाचा दर्जा कसा असेल? याचा नमुनाच प्रत्यक्ष दिसत आहे. या १ कोटी ३० लाखाच्या बसस्थानक सुशोभिकरण कामाचे क्वालिटी कंट्रोलमार्फत ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.