जळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:03 PM2018-08-21T20:03:35+5:302018-08-21T20:06:57+5:30
सहाय्यक लेखाधिकारी बालंबाल बचावले
जळगाव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २१ रोजी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील लेखा अधिकाऱ्यांच्या दालनामधील छताचा (स्लॅब) काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने सहाय्यक लेखाधिकारी एन.ओ.पाटील हे घटनेच्या पाच मिनीटांपूर्वीच तेथून उठून बाहेर गेल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, आठवडाभरातील ही दुसरी घटना असून जि.प अध्यक्षांच्या निवासस्थानातील स्लॅबदेखील कोसळल्याने अध्यक्षा थोडक्यात बचावला होता.
शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम जुन्या इमारतींवर होत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत दुसºया मजल्यावर सर्व शिक्षा अभियान विभागात मंगळवारी कर्मचारी काम करीत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लेखा अधिकारी एन.ओ.पाटील यांच्या दालनातील छताचा काही भाग टेबल, खुर्चीवर कोसळला. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाºयांनी कार्यालयाबाहेर धाव घेतली. सुदैवाने एन.ओ.पाटील हे पाच मिनिटापूर्वीच तेथून बाहेर पडले होते. मोठा आवाज झाल्याने सर्व कर्मचारी भयभीत झाले होते.
अनेक ठिकाणी गळती
जुन्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे गळती लागली असून या विभागात पाण्यामुळे फाईलीदेखील भिजल्या आहे. दरवर्षी डागडुजी केली जात असली तरी छतातून पाण्याची गळती होत असल्याने कर्मचाºयांना पावसाळ््यात काम करणे धोकादयक ठरत आहे.
गेल्या आठवड्यातच जि.प अध्यक्षांच्या निवासस्थानीदेखील छताचा काही भाग कोसळला होता. त्यात अध्यक्षा उज्ज्वला पाटील थोडक्यात बचावल्या होत्या. शासकीय इमारतींची दुरूस्ती करण्याती मागणी होत आहे.