जीएमसीत १३ नंबर कक्ष सुरू आणि फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:49+5:302021-03-23T04:17:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १३ क्रमांकाचा कक्ष रविवारी सुरू करण्यात आला. या ठिकाणी ...

Room 13 at GM starts and full | जीएमसीत १३ नंबर कक्ष सुरू आणि फुल

जीएमसीत १३ नंबर कक्ष सुरू आणि फुल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १३ क्रमांकाचा कक्ष रविवारी सुरू करण्यात आला. या ठिकाणी २५ बेडची व्यवस्था आहे. मात्र, काही कालावधीतच तो कक्षही फूल झाला. दुसरीकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दुपारी साडे तीन वाजता रुग्णालयात पुन्हा एकदा आढावा घेतला. यावेळी गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी त्यांच्याजवळ पुन्हा व्यथा मांडली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मिटींग रुममध्ये यंत्रणेकडून आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अरुण कसोटे, रुग्णालयाचे नोडल अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी किरण सावंत पाटील उपस्थित होते. डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. मनुष्यबळाचा प्रश्न मिटणार आहे. दरम्यान, पुन्हा ५० बेड साईड असिस्टंट रुग्णांच्या सेवेसाठी नेमले जाणार आहे.

वॉर रूम सेवेत

रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित झाला आहे. त्यासाठी आता पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत जिल्हाधिकारी घेणार असून लवकरच कोविड रुग्णालयात सुरक्षेसाठी पोलीस दिले जाणार आहे. यासह खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती, वॉर रूम सोमवारी २२ मार्च रोजी गठीत करण्यात आली आहे. यात रुग्णांना खाटा मिळतील का, रुग्ण-नातेवाईक संवाद घडवून आणणे, नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणे हे काम केले जाणार आहे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येणार आहे. हा वॉर रूम जनसंपर्क कक्ष येथे मंगळवारी २३ पासून कार्यान्वित करण्यात येत असून या वॉर रूमची देखील पाहणी नोडल अधिकाऱ्यांनी केली. बैठकीवेळी कृषी अधिकारी अनिल भोकरे, डॉ. संदीप पटेल, डॉ. इम्रान तेली, अधिसेवीका कविता नेतकर उपस्थित होते.

ती महिला निगेटिव्ह

आपात्कालीन विभागातील अतिदक्षता विभागात गेल्या दोन दिवसांपासून उपचार घेणारी गर्भवती महिलेचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या महिलेस या ठिकाणाहून बाहरे हलवावे, असे नातेवाईकांना सांगितले असून बाहेर कोणतेच रुग्णालय घेत नसल्याबाबत या नातेवाईकांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

Web Title: Room 13 at GM starts and full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.