डॉक्टर, कर्मचारी रुजू न झाल्याने कक्ष बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:31+5:302021-03-16T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन कोविड कक्षासाठी ३३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन कोविड कक्षासाठी ३३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले होते. मात्र, यापैकी केवळ एकच कर्मचारी रुजू झाल्याने सोमवारी हे कक्ष उघडता आले नाही. दुसरीकडे रुग्णालयातील पुन्हा दोन एक्सरे तंत्रज्ञ व अन्य एक कर्मचारी बाधित आल्याने या ठिकाणी कामावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सी वन, सीटू आणि सी थ्री कक्षात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्य इमारतीतील ७ ते ९ कक्ष कोविडसाठी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. यातील ७ व ८ क्रमांकाचा कक्ष काही दिवसांपासून बंदच करण्यात आले आहेत. सोमवारी या ठिकाणी रुग्ण दाखल करण्याचे नियोजन होते. यासाठी ७ डॉक्टर, १९ परिचारिका आणि ७ कक्षसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हे डॉक्टर रुजूच झाले नाही, जीएमसीत मनुष्यबळाची अडचण असल्याने अखेर सोमवारी हे कक्ष बंदच होते.