रोजा भुकेल्याची भूख-तहानाची जाणीव करून देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:41+5:302021-04-27T04:16:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोजा म्हणजे केवळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची यातना सहन करणे एवढेच नव्हे तर ...

Rosa makes you feel hungry and thirsty | रोजा भुकेल्याची भूख-तहानाची जाणीव करून देतो

रोजा भुकेल्याची भूख-तहानाची जाणीव करून देतो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोजा म्हणजे केवळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली मर्यादेचे तंतोतंत पालन करणे, अल्लाहची इबादत (भक्ति) करणे व वाईट प्रवृत्तींपासून दूर राहणे होय. रोजा भुकेल्याची भूख आणि तहानलेल्याच्या तहानाची जाणीव करून देतो, असे प्रतिपादन स्टुडेंट ऑफ इस्लामिक ऑर्गनायझेशनचे माजी अध्यक्ष सुहेल आमीर यांनी केले.

जळगाव जर्नलिस्ट मायनोरिटी ग्रुपतर्फे द मॅसेज ऑफ रमजान विषयावर सोमवारी ऑनलाईन वेबिनार घेण्‍यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमीर पुढे म्हणाले की, रोजा म्हणजे अल्लाहची साधना करणे होय. ईश्वराचे भय निर्माण होईल, भय म्हणजे तुमच्यावर अल्लाहची दृष्टी कायम आहे. हे जाणून घेऊन आपणाकडून कुठलाही पाप होणार नाही याची खबरदारी घेणे होय. तसेच आपल्या शरीरात अधिक प्रमाणात ग्लुकोज जमा असते. त्याचा वापर या रोजा धरताना होतो. रोजा धरल्यामुळे ब्लड शुगर आणि इन्सुलिनचे योग्य प्रमाण साध्य होते, असे विचार मुंबई येथील मोहम्मद उरूज व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रईस अमीर, साजीद शेख आणि आरिफ शेख यांनी परिश्रम केले.

Web Title: Rosa makes you feel hungry and thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.